मुंबई

कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार

अल्पमुदत पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून देण्यात येईल

प्रतिनिधी

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत पूर्णत: कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यास बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयानुसार शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. यासाठी २०१७ -१८, २०१८-१९ आणि २०१९-२० हा कालावधी विचारात घेण्यात येईल.

२०१७ या वर्षांत घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज ३० जून २०१८पर्यंत पूर्णत: परतफेड केलेले असल्यास आणि २०१८ -१९ या वर्षांतील अल्पमुदत पीक कर्ज ३० जून २०१९पर्यंत पूर्णत: परतफेड केले असल्यास त्याचप्रमाणे २०१९-२० या वर्षातील अल्पमुदत पीक कर्ज ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत पूर्णत: परतफेड केले असल्यास २०१९-२० या वर्षातील अल्पमुदत पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून देण्यात येईल.

मात्र, २०१९ -२० या वर्षातील घेतलेल्या आणि त्याची पूर्णत: परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम ५० हजारांपेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दलाच्या रकमेइतका प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल.

राजकीय ‘सिच्युएशनशिप’च्या कात्रीत उबाठा

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन