Mumbai : रिक्षा-टॅक्सी चालकांकडून मराठी सक्तीच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान  'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mumbai : रिक्षा-टॅक्सी चालकांकडून मराठी सक्तीच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान

ऑटो रिक्षा, टॅक्सी आणि ॲपआधारित कॅब चालकांसाठी मराठी भाषेचे व्यावहारिक ज्ञान अनिवार्य करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाविरोधात मुंबईतील चार टॅक्सीचालकांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

Swapnil S

मुंबई : ऑटो रिक्षा, टॅक्सी आणि ॲपआधारित कॅब चालकांसाठी मराठी भाषेचे व्यावहारिक ज्ञान अनिवार्य करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाविरोधात मुंबईतील चार टॅक्सीचालकांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शासनाचा हा निर्णय नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारा असल्याचे या याचिकेत म्हटले आहे. या प्रकरणी गुरुवारी उच्च न्यायालयात तातडीच्या सुनावणीसाठी उल्लेख होण्याची शक्यता आहे. ॲड. विवेक शुक्ला यांच्यामार्फत दाखल करण्यात आलेल्या या जनहित याचिकेत १२ ऑगस्ट रोजी जारी करण्यात आलेल्या शासकीय अधिसूचनेमुळे लाखो गरीब आणि कष्टकरी स्थलांतरित चालकांच्या उपजीविकेवर गदा येण्याचा धोका व्यक्त करण्यात आला आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीला तत्काळ स्थगिती देण्याची मागणीही याचिकाकर्त्यांनी केली आहे.

मोहम्मद कासिम अहमद, मोहम्मद तौसीफ शेख, सियाद अहमद आणि सादिक नासीर अली खान यांनी ही याचिका दाखल केली असून, हा नियम संविधानातील कलम १४, कलम १९ आणि कलम २१ अंतर्गत मिळालेल्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारा आहे, असा दावा त्यांनी केला आहे. मोटार वाहन कायद्यात वाहन चालविण्याच्या परवान्यासाठी कोणत्याही विशिष्ट भाषेची अट घातलेली नाही. त्यामुळे हा निर्णय कायद्याच्या चौकटीबाहेरचा असल्याचे चालकांचे म्हणणे आहे. मोटार वाहन कायदा राज्य सरकारला कोणत्याही भाषेच्या ज्ञानाची अट घालण्याचा किंवा त्या आधारावर बॅच निलंबित करण्याचा अधिकार देत नाही, असेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

बदलापुरात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात; १६ ऑक्टोबरपासून चक्राकार पद्धतीने पाणीपुरवठा बंद

Mumbai : स्वतः बसवलेल्या CCTV मध्येच कैद झाला मृत्यूचा क्षण! घाटकोपरमध्ये भरधाव कारच्या धडकेत BMC कर्मचाऱ्याचा मृत्यू

पत्नीशी वाद टाळण्यासाठी बाल्कनीतून पळण्याचा प्रयत्न जीवावर; २१ व्या मजल्यावरून पडून पतीचा मृत्यू

Kalyan-Dombivli : केडीएमसीत ३६ तास पाणीकपात; १५ ऑक्टोबरला २४ तास पाणीपुरवठा बंद

CJP Protest : रांका, दास यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी; तिहारमध्ये रवानगी, दिपके आक्रमक, म्हणाले - "हिंमत असेल तर...