मुंबई

बाबा सिद्दिकींनी काँग्रेस सोडताच मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून पुत्र झिशान सिद्दिकींना हटवले

बाबा सिद्दिकी यांच्या पक्षांतरामुळे झिशान सिद्दिकी हे सुद्धा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आज ना उद्या पक्ष सोडतील याची भिती काँग्रेसला वाटत आहे.

Swapnil S

मुंबई : माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचे पुत्र आमदार झिशान सिद्दिकी यांची बुधवारी मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आले. सिद्दिकी यांच्या जागी अखिलेश यादव यांची मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

बाबा सिद्दिकी यांच्या पक्षांतरामुळे झिशान सिद्दिकी हे सुद्धा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आज ना उद्या पक्ष सोडतील याची भिती काँग्रेसला वाटत आहे. त्यामुळे काँग्रेसने बुधवारी सिद्दिकी यांना हटवून त्यांच्या जागी अखिलेश यादव यांची मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून नेमणूक केली आहे.

अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. यांनी यासंदर्भातील घोषणा केली. मुंबई युवक काँग्रेसमध्ये कार्याध्यक्ष हे पद निर्माण करण्यात आले असून, कार्याध्यक्षपदी सुफियान मोहसीन हैदर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत