दिवंगत बाबा सिद्दीकी यांचे संग्रहित छायाचित्र 
मुंबई

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण : नऊ आरोपींच्या कोठडीत एक दिवसाची वाढ, आतापर्यंत १४ आरोपींना अटक

राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी नऊ आरोपींच्या पोलीस कोठडीत एक दिवसाची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे या सर्वांना शनिवारी दुपारी पुन्हा किल्ला न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Swapnil S

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी नऊ आरोपींच्या पोलीस कोठडीत एक दिवसाची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे या सर्वांना शनिवारी दुपारी पुन्हा किल्ला न्यायालयात हजर केले जाणार आहे.

शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आलेल्यांमध्ये गुरमेल बलजीत सिंग, धर्मराज राधे कश्यप, प्रविण रामेश्वर लोणकर, हरिशकुमार बालकराम निशाद, नितीन गौतम सप्रे, प्रदीप दत्तू ठोंबरे, चेतन दिलीप पारधी, संभाजी किसन पारधी, राम फुलचंद कनोजिया यांचा समावेश होता. १२ ऑक्टोबरला बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर या गुन्ह्याचा तपास स्थानिक पोलिसांकडून गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाकडे सोपविण्यात आला होता. गोळीबार करणाऱ्या दोन शूटरसह इतर आरोपींना पुणे, उत्तरप्रदेश तसेच इतर ठिकाणांहून अटक करण्यात आली होती.

आतापर्यंत चौदा आरोपींना अटक

आतापर्यंत याच गुन्ह्यात पोलिसांनी चौदा आरोपींना अटक केली असून ते सर्वजण सध्या पोलीस कोठडीत आहेत. त्यापैकी नऊ आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना शुक्रवारी दुपारी किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी पोलिसांच्या वतीने त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. यावेळी न्यायालयाने नऊ आरोपींच्या पोलीस कोठडीत एक दिवसाची वाढ केली आहे. त्यामुळे या सर्वांना शनिवारी पुन्हा किल्ला न्यायालयात हजर केले जाणार आहे.

१२ ऑक्टोबर रोजी वांद्रे परिसरात माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेने देशभर खळबळ माजली. या धक्कादायक प्रकारानंतर पोलीस यंत्रणेने तपासाची सूत्रे वेगाने हलवत आतापर्यंत १४ आरोपींना अटक केले आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी