बाबा सिद्दीकी  
मुंबई

देसाईमुळे लोणकर बिश्णोई गँगमध्ये; सिद्दीकी हत्या प्रकरण

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येतील मुख्य आरोपी मास्टरमाईंड शुभम लोणकर याच्यासंबंधित एक महत्त्वाचा खुलासा समोर आला आहे.

Swapnil S

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येतील मुख्य आरोपी मास्टरमाईंड शुभम लोणकर याच्यासंबंधित एक महत्त्वाचा खुलासा समोर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देसाई नावाच्या व्यक्तीने लोणकर याला कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिशनोई याच्या गँगमध्ये आणले होते, असे उघडकीस आले आहे.

२०१८ला शुभम लोणकर लष्करात भरती होण्यासाठी राजस्थान, जैसलमेरला गेला होता. मात्र, निवड प्रक्रियेत तो पास होऊ शकला नव्हता. याच ठिकाणी त्याची भेट देसाई नावाच्या इसमाशी झाली. देसाईनेच लोणकर याची ओळख लॉरेन्सच्या जैसलमेर येथील सभासदाशी करून दिली. त्यानंतरच लोणकरला प्रशिक्षणासाठी गँगमार्फत नेपाळला पाठविण्यात आले होते.

प्रशिक्षणानंतर परत आल्यावर लोणकर याने गँगसाठी नवीन तरुणांची भरती करण्याचे काम सुरू केले. लोणकरला यापूर्वी अकोला जिल्ह्यातील पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळीच त्याने देसाई आणि बिश्नोई गँगशी आपले संबंध असल्याची माहिती पोलिसांना दिली होती. परंतु त्यावेळी या माहितीचे गांभीर्य पोलिसांना जाणवले नाही.

Maratha Reservation : मराठा वादळाने मुंबईला हादरा; आता माघार नाही – मनोज जरांगेंचा निर्धार; पावसामुळे आंदोलकांचे प्रचंड हाल

मुंबईला पावसाने झोडपले; पुढील तीन दिवस मध्यम पावसाची शक्यता

महायुतीच्या घोडचुकीमुळे मुंबईकर वेठीस; मराठा आंदोलनामुळे मुंबईत गोंधळाची स्थिती

आंदोलनामुळे हॉटेल, दुकाने बंद; आंदोलकांची झाली गैरसोय, सोबत १५ दिवसांची शिदोरी...

CSMT टाळण्याचे प्रवाशांना रेल्वेचे आवाहन; मराठा आरक्षण आंदोलनामुळे दक्षिण मुंबई ठप्प