मुंबई

मीरा रोडमधील जातीय दंगल प्रकरणी आरोपींना जामीन; हिंसाचाराला पूर्वनियोजित कट म्हणता येणार नाही - हायकोर्ट

राम नवमीच्या आदल्या दिवशी मीरा रोड येथे जातीय दंगल केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या १४ जणांचा मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला.

Swapnil S

मुंबई : राम नवमीच्या आदल्या दिवशी मीरा रोड येथे जातीय दंगल केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या १४ जणांचा मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. सीसीटीव्ही फुटेज पाहता सकृतदर्शनी हा हिंसाचार पूर्वनियोजित कट होता असे म्हणता येणार नसल्याचे न्यायमूर्ती एन. जे. जमादार म्हणाले. तसेच खटल्याची सुनावणी लवकर होण्याची शक्यता नसल्याचे स्पष्ट करत या चौदा जणांना ३० हजारांचा जामीन मंजूर केला.

अयोध्या येथील राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त मीरा रोड येथे काढण्यात आलेल्या रॅलीवर ५० ते ६० जणांच्या जमावाने हल्ला केला. याप्रकरणी पोलीसांनी १४ जणांना अटक केली. त्यांच्या विरोधात हल्ला करणे, रॅलीतील लोकांना घेराव घालणे, घोषणाबाजी करणे आदी गुन्हे दाखल करून अटक केली. या प्रकरणी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात जामीनासाठी याचिका दाखल केली.

खटला लवकर संपण्याची शक्यता नाही...

यावेळी न्यायालयाने ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी राममंदिराचा अभिषेक सोहळा साजरा करणाऱ्या ताफ्याची उपस्थिती ही केवळ संधीसाधू होती. त्यामुळे हा हल्ला कट होता असे म्हणता येणार नाही, असे स्पष्ट केले. सीसीटीव्ही फुटेज पाहता आरोपी कोणत्याही तक्रारदाराला किंवा इतर कोणत्याही व्यक्तीला त्रास देताना दिसत नाही. तपास पूर्ण झालेला आहे. सर्व आरोपी जानेवारीपासून कोठडीत असून, खटला लवकर संपण्याची शक्यता नसल्याचे नमूद करत सर्व आरोपींना जामीन मंजूर केला.

ओबीसी आरक्षणाला धक्का नाही! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही; नोंदी असलेल्यांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळणार

‘देवाभाऊ’ कॅम्पेनवरून जोरदार वादंग; जाहिरात देणारा भाजपच्या मित्रपक्षाचा मंत्री - रोहित पवार

मुंबईला मिळणार वातानुकूलित वंदे मेट्रो; २ हजार ८५६ डब्यांच्या खरेदीची निविदा जाहीर

निवडणूक आयोग भाजपचे कार्यालय बनले का? मल्लिकार्जुन खर्गे यांची टीका

अस्तित्व वाचवण्यासाठी ओमी कलानींची धडपड; अखेर युतीसाठी शिंदे गटाचा दरवाजा ठोठावला