बी. आर्किटेक्चर प्रवेश नोंदणीस मुदतवाढ; उद्यापर्यंत करता येणार नोंदणी 'एआय'ने बनविलेली प्रतिमा
मुंबई

बी. आर्किटेक्चर प्रवेश नोंदणीस मुदतवाढ; उद्यापर्यंत करता येणार नोंदणी

तंत्रशिक्षणाच्या अंतर्गत असलेल्या बी. आर्किटेक्चर या अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेशाच्या नोंदणीस २८ जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जे विद्यार्थी या अभ्यासक्रमास पात्र आहेत, त्या विद्यार्थ्यांनी केंद्रीभूत प्रवेशासाठी नोंदणी करावी, असे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे.

Swapnil S

मुंबई : तंत्रशिक्षणाच्या अंतर्गत असलेल्या बी. आर्किटेक्चर या अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेशाच्या नोंदणीस २८ जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जे विद्यार्थी या अभ्यासक्रमास पात्र आहेत, त्या विद्यार्थ्यांनी केंद्रीभूत प्रवेशासाठी नोंदणी करावी, असे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे.

बी. आर्किटेक्चर या अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेशाची नोंदणी १४ जुलैपासून सुरु झाली. विद्यार्थ्यांना २४ जुलै पर्यंत अर्ज करता येणार होता. आता पुन्हा २८ जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या अभ्यासक्रमास आजपर्यंत ६१६० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता बी. आर्किटेक्चर प्रथम वर्षात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी करताना कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत. व कागदपत्रांची 'ई-पडताळणी' किंवा 'प्रत्यक्ष पडताळणी या पद्धती सुरू केल्या आहेत. ऑनलाइन अर्ज भरताना विद्यार्थ्याने कागदपत्रांच्या पडताळणीसाठी यापैकी कोणत्याही एका पद्धतीची निवड करावी.

'ई-स्क्रूटिनी' पद्धत निवडल्यास, अर्जाची पडताळणी आणि पुष्टीकरण संबंधित 'ई-स्क्रूटिनी केंद्रा'द्वारे ऑनलाइन पद्धतीने केले जाणार आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : वरळीत महागडा भाडेकरार; दरमहा २८.५ लाख रुपयांचे भाडे

Mumbai : विनापरवानगी चरासाठी शुल्क; चर खोदणे व पुनर्भरण सर्वसमावेशक धोरण-२०२६, युटीलिटी कामांसाठी डायमंड कटर बंधनकारक

Mumai : वांद्रे येथे सहाव्या मार्गिकेसाठी नवीन फलाट; सुमारे १०० कुटुंबांचे पुनर्वसन अंतिम टप्प्यात

'कोबी'ला दोन रुपये किलो भाव; तीन एकर कोबीवर आधी मेंढ्या सोडल्या, नंतर रोटावेटर फिरवून उभे पीक केले नष्ट

Navi Mumbai : द्रोणागिरीत पाण्यासाठी टाहो! ३५० कुटुंबे पाण्याविना; टँकरवर दरमहा पाच लाखांचा खर्च