मुंबई

बासमती तांदळाच्या दरात झाली वाढ; मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने दर चढेच

बासमतीची लागवड उत्तरेकडील राज्यात मोठ्या प्रमाणावर केली जाते

प्रतिनिधी

मागील आठवडाभरात एपीएमसी बाजारासह राज्यातील विविध बाजारपेठांत सर्वच बासमती तांदळाच्या दरात क्विंटलमागे २०० ते ३०० रुपयांनी वाढ झाली आहे. पारंपरिक बासमती सेला तांदूळ वगळल्यास बासमतीच्या सर्व प्रकारचे दर तेजीत आहेत. दरम्यान, मागणीच्या तुलनेत बासमती तांदळाची आवक कमी होत असल्याने दरात तेजी असल्याचे एपीएमसी धान्य मार्केटमधील व्यापारी हर्ष ठक्कर यांच्याकडून सांगण्यात आले. तर बासमतीचा जुना साठा बाजारात शिल्लक असल्याने नवीन हंगामातील आवक होईपर्यंत बासमतीचे दर चढेच राहणार असल्याचेदेखील व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.

बासमतीची लागवड उत्तरेकडील राज्यात मोठ्या प्रमाणावर केली जाते. तेथील शेतकऱ्यांकडे सध्या तांदूळ उपलब्ध नाही. गिरणी आणि वितरकांकडे साठवणुकीतील बासमती तांदूळ आहे. अशातच परदेशातून बासमतीला मागणी वाढत असून बासमतीच्या १५०९ (धान) जातीला वर्षभरापूर्वी २६०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता. सध्या बासमती १५०९ जातीला प्रतिक्विंटल ४१०० रुपये भाव मिळत असल्याचे तांदळाचे व्यापारी ठक्कर यांनी सांगितले. दरम्यान, निर्यातदार व्यापाऱ्यांकडून बासमती तांदळाला मागणी वाढत आहे.

बासमतीच्या १५०९ जातीचा हंगाम संपत आला आहे. मागणी वाढती असून उत्तरेकडील राज्यांतील शेतकऱ्यांनी पारंपरिक बासमतीच्या तुलनेत १५०९ जातीच्या बासमती तांदळाच्या लागवडीस प्राधान्य दिले जात आहे. पारंपरिक बासमतीच्या तुलनेत १५०९ जातीच्या बासमतीच्या लागवडीस तुलनेने कमी कालावधी लागतो. परिणामी, बाजारात बासमतीच्या १५०९ च्या नवीन पिकाची आवक सुरू झाली असून परदेशात म्हणजेच इराण आणि सौदी अरेबियातून बासमती तांदळाला मागणी वाढली आहे.

२४ तासांत आंदोलकांना हटवा! मुंबई उच्च न्यायालयाचा जरांगे यांना अल्टिमेटम; आझाद मैदानात फक्त पाच हजार आंदोलकांना परवानगी

सुहाना खानच्या अडचणी वाढणार? शेतजमीन खरेदीवर वाद; अटींचा भंग केल्याचा आरोप; महसूल विभागाकडून चौकशी सुरू

Maratha Reservation : आंदोलनाला ‘खेळकर’ रंग; आंदोलकांचे मुंबईत क्रिकेट, कबड्डी, खो-खो

पुण्याहून आझाद मैदानाकडे निघालेल्या मराठा बांधवांवर पनवेलमध्ये किरकोळ कारणावरून हल्ला; ५ जण जखमी, दोघांना अटक

मत चोरीच्या अणुबॉम्बनंतर आता हायड्रोजन बॉम्ब येणार; मोदींना चेहरा लपविण्यासाठीही जागा मिळणार नाही; राहुल गांधींचा मोठा इशारा