PM
मुंबई

बेघर संघर्ष समितीचे आझाद मैदानात उपोषण शासनाच्या घरकुल योजनेसाठी निधी; मात्र भूखंड नाही

नवशक्ती Web Desk

मुंबई : गोरगरीब जनतेला शासनाच्या घरकुल योजनेच्या माध्यमातून निवारा देण्यात येतो. त्यासाठी सरकारकडे निधी आहे; मात्र भूखंड उपलब्ध होत नसल्याने गोरगरीब जनता घरकुल योजनेपासून वंचित आहेत. या पार्श्वभूमीवर बेघर संघर्ष समितीच्या वतीने मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

ग्रामीण भागात खेडोपाडी घरकुल योजना म्हाडा मार्फत बांधण्याचे काम सुरू करावे. त्यामुळे भूखंड मिळवणे व निवारा करणे या दोन्ही गोष्टी योग्य होतील व भूखंड नाही, अशी बाब समोर येणार नाही. सरकारी योजना कधी कधी कागदावर असतात. कागदावर नसलेल्या तळागाळापर्यंत पोहचतात; मात्र विविध त्रुटी, सबब सांगून त्या  लाभार्थीना मिळेपर्यंत भिक नको पण कुत्रा आवर अशी स्थिती सामान्य नागरिकांची होते. याचे जिवंत उदाहरण म्हणजे शहादा नगरपालिकेत २० कोटी रुपयांचा घरकुल निधी भूखंड नसल्याने पाडून आहे.

गरिबांची घरकुले बांधण्यासाठी आलेला २० कोटी रुपयांचा निधी शहादा नगरपालिकेत पडून आहे. अशा प्रकारे विविध ठिकाणी राज्यभर परिस्थिती असल्याची माहिती बेघर संघर्ष समिती नंदुरबारचे अध्यक्ष दिलावरशाह यांनी दिली यावेळी दिली. सरकारने किती निधी वितरीत केला आहे व किती पडून आहे. याची माहिती सरकारने दिल्याशिवाय मी हे आमरण उपोषण मागे घेणार नाही, असा इशारा समितीने दिला आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस