BEST चे अपघात सत्र थांबेना; अंधेरीत बसची १४ वाहनांना धडक; दोघे जखमी, बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याचा प्राथमिक अंदाज 
मुंबई

BEST चे अपघात सत्र थांबेना; अंधेरीत बसची १४ वाहनांना धडक; दोघे जखमी, बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याचा प्राथमिक अंदाज

गेल्या काही दिवसांत ‘बेस्ट’ बसच्या अपघातांचे सत्र थांबण्याचे चिन्ह दिसत नाही. शुक्रवारी दुपारी अंधेरी परिसरात ‘बेस्ट’च्या भाडेतत्त्वावरील बसच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बसने तब्बल १४ वाहनांना धडक दिली.

Swapnil S

मुंबई : गेल्या काही दिवसांत ‘बेस्ट’ बसच्या अपघातांचे सत्र थांबण्याचे चिन्ह दिसत नाही. शुक्रवारी दुपारी अंधेरी परिसरात ‘बेस्ट’च्या भाडेतत्त्वावरील बसच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बसने तब्बल १४ वाहनांना धडक दिली. या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत. गेल्या दोन दिवसांतील ‘बेस्ट’ बसची ही दुसरी मोठी दुर्घटना आहे.

बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात भाडेतत्त्वावरील बसेसचे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. दोन दिवसांपूर्वी भांडुप येथे भाडेतत्त्वावरील बसचा अपघात झाला. या अपघातात एक जण जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी अंधेरी सबवेजवळील एस. व्ही. रोडच्या दक्षिण वाहिनी मार्गावर पुन्हा बेस्ट बसचा अपघात झाला. मिल्लत नगर ते अंधेरी (पश्चिम) बसस्थानक या मार्गावरील क्रमांक २४२ ची बस सीझर रोडवरून उजवीकडे वळत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाला.

या अपघातात शांतालाल यादव (३३) व साक्षी (३३) हे दोघे जखमी झाले, तर नऊ रिक्षा, चार खासगी कार आणि एका तीनचाकी टेम्पोला बसने धडक दिली. या अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. दरम्यान, दुर्घटनाग्रस्त बस नंतर टोईंगद्वारे अंधेरी पश्चिम बस डेपोत हलविण्यात आली.

दुसरी मोठी दुर्घटना

गेल्या बुधवारी भांडुप येथे भाडेतत्त्वावरील इलेक्ट्रिक बस रिव्हर्स घेताना काही वाहनांना धडकली होती. त्या अपघातात एका ४३ वर्षीय व्यक्तीला दुखापत झाली होती. त्यानंतर आता दोन दिवसांच्या अंतराने दुसरा मोठा अपघात घडल्याने ‘बेस्ट’च्या भाडेतत्त्वावरील बसेस कितपत सुरक्षित आहेत, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Maharashtra MLC Elections : राज्यातील विधान परिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Mumbai Ganeshotsav 2026 : अवघ्या '१ इंच'चा बाप्पा; शिवलिंगात विराजमान झालेल्या गणरायाचा Video व्हायरल

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणातील CCTV फुटेज पोलिसांच्या हाती; परीक्षा केंद्रातील 'त्या' १५ मिनिटांत नेमकं काय घडलं?

Bihar Viral Video : अल्पवयीन विद्यार्थिनीला घेरून गैरवर्तन; मुख्य आरोपी पोलिसांच्या चकमकीत जखमी

सोनिया गांधी मतदार यादी प्रकरणाला नवे वळण; कायदेशीर त्रुटींमुळे कनिष्ठ न्यायालयाचा आदेश रद्द, तक्रारीवर नव्याने सुनावणी