Mumbai : पवईत बेस्ट बसची दुभाजकाला धडक 
मुंबई

Mumbai : पवईत बेस्ट बसची दुभाजकाला धडक

भांडुप, मानखुर्द येथे बेस्ट बसच्या अपघाताची घटना ताजी असतानाच गुरुवारी सकाळी ११.०५ वाजण्याच्या सुमारास पवई विहार संकुलजवळ बेस्टच्या भाडेतत्त्वावरील बस दुभाजकाला धडकली.

Swapnil S

मुंबई : भांडुप, मानखुर्द येथे बेस्ट बसच्या अपघाताची घटना ताजी असतानाच गुरुवारी सकाळी ११.०५ वाजण्याच्या सुमारास पवई विहार संकुलजवळ बेस्टच्या भाडेतत्त्वावरील बस दुभाजकाला धडकली. या घटनेत सहा प्रवासी जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी साकीनाका येथील पॅरामाऊंट रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, या घटनेची चौकशी सुरू असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले. 

विक्रोळी आगारातून वांद्रे (पश्चिम) बस स्थानकाकडे जाणारी ए-४२२/३६ मार्गावरील (बस क्रमांक ८६८८) बस सकाळी ११.०५ वाजता पवई विहार संकुलाजवळ आली  असता चालकाच्या डाव्या बाजूने एक कार येत असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. कारकडे लक्ष गेल्याने बसवरील नियंत्रण सुटून बस रस्त्याच्या उजव्या बाजूच्या दुभाजकावर जाऊन धडकली.

या अपघातात बसमधील सहा प्रवासी किरकोळ जखमी झाले. जखमींना बस वाहकाने तातडीने साकीनाका येथील पॅरामाउंट रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सर्व जखमींची प्रकृती स्थिर असून त्यांना किरकोळ दुखापती झाल्याचे बेस्ट प्रशासनाने स्पष्ट केले आहे.अजय शिंदे, साक्षी पिसाळ, बाबर सिंग, मनोज गुप्ता, प्रणिती माळी, नादिर शाह अशी जखमींची नावे आहेत.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

CJP Protest : आज देशव्यापी आंदोलन; शांततापूर्ण सहभागाचे कॉकरोच पार्टीचे आवाहन

Mumbai : पालिका मुख्यालयातील उपाहारगृह सील; FDA ची कारवाई, १५ दिवसांसाठी परवाना रद्द 

NEET Paper Leak : पूर्वीच्या पेपरफुटीतील आरोपीविरुद्ध पुरावे नाहीत - CBI

Mumbai : ‘मोडकसागर’ही तुडुंब; सातपैकी ४ धरणे गेली ओसंडून, एकूण पाणीसाठा ७० टक्क्यांवर

NEET पेपरफुटीप्रकरणी फास्ट ट्रॅक न्यायालय; पंतप्रधान मोदींची घोषणा