मुंबई

बेस्टचा डोलारा कंत्राटी कंपनीवर अवलंबून; आणखी एक नवीन कंत्राटदार करणार २५० बसचा पुरवठा

Swapnil S

मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात तीन हजार बसेस स्वमालकीच्या असाव्यात हे धोरण बेस्टने बाजूला ठेवले आहे. जलद व वेळेवर बसेस उपलब्ध व्हाव्यात, यासाठी अधिकाधिक बसेस भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत.

यासाठी पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन कंपनीसोबत करार केला आहे. ही कंपनी बेस्टला २५० इलेक्ट्रिक बसेसचा पुरवठा करणार आहे. त्यामुळे बेस्टला आणखी एक नवीन कंत्राटदार उपलब्ध झाला आहे.

हरयाणा स्थित पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन कंपनी असून त्या मार्फत १२ मीटर लांबीच्या २५० बस गाड्या घेण्यात येणार आहेत. या बस गाड्या येत्या तीन महिन्यांत टप्प्याटप्प्याने दाखल होणार आहेत. बेस्ट उपक्रमाचे माजी महाव्यवस्थापक विजय सिंघल यांनी या करारास मान्यता दिली आहे. ही कंपनी २,४०० बस गाड्यांचा पुरवठा करणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात बेस्ट उपक्रमाचा बस ताफा वाढणार आहे.

बेस्ट उपक्रमाचा स्वमालकीच्या बसेसचा ताफा दिवसेंदिवस कमी होत असून मोठ्या प्रमाणात बेस्ट बस गाड्यांची कमतरता निर्माण झाली आहे. बसेसची अपुरी संख्या पहाता बेस्ट उपक्रमास नाइलाजास्तव काही बस मार्ग बेस्ट तात्पुरत्या स्वरूपात रद्द करावे लागले आहेत. कंत्राटदारांकडून लवकरात लवकर बस गाड्या घेण्यासाठी बेस्ट उपक्रमाने तगादा लावला आहे. सध्या मातेश्वरी कंपनीकडून २०० सीएनजी बसेस, ओलेक्ट्रा कंपनीकडून २,१०० इलेक्ट्रिक बसेस, स्विच मोबिलिटीकडून २०० दुमजली इलेक्ट्रिक बसेस व कॉसिस कंपनीकडून ७०० दुमजली बस घेण्याचे करार याआधीच समंत झाला आहे. मात्र या नवीन बस गाड्या येण्याचा वेग पाहता दुसरा पर्याय म्हणून बेस्टने आणखी दोन करारास मान्यता दिली आहे. त्यात पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन कंपनीचा समावेश झाला आहे.

यात २५० बसेसचा पुरवठा करण्यात येणार असून एक बस चार्जिंग केल्यानंतर १८० किलोमीटर धावणार असून ३० ते ४० मिनिटांत एक बस चार्ज होणार आहे.

सध्या बेस्ट बसेसचा ताफा

-बेस्ट उपक्रमाच्या २,९४० बसेस

-भाडेतत्त्वावरील १,८३६ बसेस

-एकूण बस ताफा - २ हजार ९४०

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त