मुंबई

बेस्ट उपक्रमाने व्यावसायिक वापरासाठी जागा भाड्यावर देण्यासाठी निविदा मागवल्या

प्रतिनिधी

आर्थिक कोंडी फोडण्यासाठी बेस्ट उपक्रमाने व्यावसायिक वापरासाठी जागा भाड्यावर देण्यासाठी निविदा मागवल्या आहेत. कुलाबा ते मुलुंड-दहिसरदरम्यान बेस्ट उपक्रमाच्या जागा भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे.

सुरक्षित व गारेगार प्रवासाची सुविधा देणाऱ्या बेस्ट उपक्रमाची गेल्या काही वर्षांत आर्थिक कोंडी वाढली आहे. बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापकपदी लोकेश चंद्र यांनी धुरा सांभाळल्यापासून बेस्ट उपक्रमाची आर्थिक कोंडी फोडण्यासाठी नवनवीन योजना अंमलात आणल्या आहेत. बेस्ट उपक्रमाचे शहर व उपनगरात मिळून २७ बस आगार आहेत. तसेच वसाहती, कार्यालये आहेत. या जागेचा हवा तसा वापर होत नसल्याने कमर्शिअल म्हणजेच व्यवसाय करण्यासाठी बेस्ट उपक्रमाने ही जागा भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे. कुलाबा ते मुलुंड-दहिसरदरम्यान बेस्ट उपक्रमाने २० ठिकाणच्या जागा भाडेतत्त्वावर देण्यासाठी निविदा मागवल्या आहेत. मासिक मोबदल्यावर या जागा कमर्शिअल व्यवसायासाठी देण्यात येणार आहेत.

या जागांसाठी निविदा!

कांदिवली पश्चिम येथील कर्मचारी वसाहतीतील इमारत क्रमांक ‘अ’मधील तळमजला, भोईवाडा येथील कर्मचारी वसाहतीतील इमारत क्रमांक ‘बी’मधील तळमजला, ताडदेव येथील अरुण कमर्शिअल प्रिमायसेस इमारतीतील पाचव्या मजल्यावर, परळ येथील कर्मचारी वसाहतीतील इमारत क्रमांक ए मधील तळमजल्यावर, मुलुंड पश्चिम येथील कर्मचारी वसाहत परिसरात असलेल्या वेगळ्या इमारतीतील पहिल्या मजल्यावर, मागाठाणे येथील वाहतूक कार्यालय इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर अशा एकूण २० ठिकाणी कमर्शिअल वापरासाठी जागा भाड्यावर देण्यासाठी निविदा मागवल्या आहेत.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस