मुंबई

63-hour Mega Block: प्रवाशांच्या मदतीला बेस्ट-एसटीची धाव, तीन दिवसीय ब्लॉक दरम्यान जादा गाड्या चालवणार

ठाण्यात ६३ तर सीएसएमटी स्थानकात ३६ तासांचा जंम्बो ब्लॉक घेतला आहे. ब्लॉक कालावधीत तब्बल ९३० लोकल रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी...

Swapnil S

मुंबई : ठाणे व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातील प्लॅटफॉर्मचा विस्तार करण्यासाठी शुक्रवार, शनिवार व रविवार तीन दिवस जंम्बो ब्लॉक घेतला आहे. ठाण्यात ६३ तर सीएसएमटी स्थानकात ३६ तासांचा जंम्बो ब्लॉक घेतला आहे. ब्लॉक कालावधीत तब्बल ९३० लोकल रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी बेस्ट उपक्रमाने तीन दिवस ५५ अतिरिक्त बसेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. जादा ५५ बसेसच्या ४८६ जादा बस फेऱ्या चालवण्यात येणार असल्याचे बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांनी सांगितले. दरम्यान, ५५ जादा बसेस मध्ये वातानुकूलित दुमजली बस गाड्यांचा समावेश आहे.

ठाणे व सीएसएमटी स्थानकातील प्लॅटफॉर्मचा विस्तार करण्यासाठी शुक्रवार शनिवार व रविवार तीन दिवस जंम्बो ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉक कालावधीत प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रमाने ५५ जादा बसेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, प्रवाशांची मागणी लक्षात घेता अधिक बसेस चालवण्यात येतील, असेही ते म्हणाले.

ठाण्यासाठी जादा ५० एसटी

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर घेण्यात आलेल्या ब्लॉकमुळे शुक्रवार, शनिवार आणि रविवारी प्रवाशांचे हाल होणार आहेत. प्रवाशांना दिलासा देण्यासाठी एसटी महामंडळ धावून आले आहे. एसटी महामंडळाने रेल्वेच्या ब्लॉक काळात ५० जादा एसटी गाड्या चालविण्याचे ठरवले आहे.

कुर्ला नेहरुनगर, परळ आणि दादर स्थानकातून ठाण्यासाठी ५० जादा एसटी गाड्या चालविण्यात येतील. मुंबई आगारातील २६ आणि ठाणे आगारातून २४ गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. या गाड्यांमध्ये आवश्यकतेनुसार वाढ करण्यात येणार आहे. प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी ठाणे आणि मुंबई आगारात अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहे.

अशा धावतील बेस्ट बसेस

१ जून रात्री १२. ३० वाजल्यापासून २ जून दुपारी १२. ३० वाजेपर्यंत बस फेऱ्या

  • १) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते दादर स्थानक पूर्व

  • २) मर्यादित इलेक्टिक हाऊस ते भायखळा स्थानक पश्चिम

  • ३) ए सी १० इलेक्टिक हाऊस ते वडाळा स्थानक पश्चिम

एकूण १२ ------------ २३२

३१ मे , १ जून व २ जून दुपारी १२. ३० वाजेपर्यंत सकाळ व संध्याकाळ प्रवर्तन

१ इलेक्ट्रिक हाऊस ते खोदादाद सर्कल

ए २ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते भायखळा स्था ( प )

२ मर्यादित छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते भायखळा स्था (प )

ए सी १० इलेक्ट्रिक हाऊस ते वडाळा स्थानक पश्चिम

११ मर्यादित छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते धारावी आगार

१४ डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी चौक ते प्रतीक्षा नगर आगार

ए सी ४२ राणी लक्ष्मी बाई चौक ते बाळकूम [ दादलानी पार्क ]

ए ४५ बॅकबे आगार ते एम एम आर डी ए वसाहत विस्ता [ माहुल ]

ए १७४ अँटॉप हिल ते प्लाझा

एकूण ४३---------------२५४

मुख्यमंत्रीपदाचा फैसला आज; महायुतीचे नेते व केंद्रीय संसदीय मंडळ घेणार निर्णय

महायुतीत मंत्रिपदासाठी २१-१२-१० चा फॉर्म्युला

आजपासून सुरू होणारे संसदेचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार; अदानी, मणिपूरवर चर्चा करा! सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांची मागणी

यशस्वी, विराटचा शतकी तडाखा; भारताचा दुसरा डाव ४८७ धावांवर घोषित; ऑस्ट्रेलियाची ३ बाद १२ अशी अवस्था

यूपीतील हिंसाचारात तिघांचा मृत्यू; २० पोलिसांसह अनेक जण जखमी