मुंबई

गणेशोत्सवात बेस्ट विशेष हेरिटेज टूर चालवणार

हेरिटेज दुमजली बसगाड्या रात्री १० वाजता ते सकाळी ६ या वेळेत एक तासाच्या प्रस्थांतराने चालवल्या जातील.

प्रतिनिधी

दक्षिण मुंबईतील प्रेक्षणीय स्थळे पाहण्याकरिता बेस्ट उपक्रमाद्वारे खुल्या - दुमजली बसद्वारे हेरिटेज टूर बससेवा चालविली जाते. आता येणाऱ्या ३१ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या गणेशोत्सव कालावधीदरम्यान दक्षिण मुंबईतील विविध गणपती मंडळांना विशेषतः फोर्ट, गिरगाव, खेतवाडी, लालबाग, भायखळा इत्यादी ठिकाणी रात्रीच्या वेळेस भेट देण्याकरिता बेस्टने विशेष हेरिटेज टूर बससेवा चालविण्याचे ठरवले आहे.

हेरिटेज दुमजली बसगाड्या रात्री १० वाजता ते सकाळी ६ या वेळेत एक तासाच्या प्रस्थांतराने चालवल्या जातील. या बससेवेची सुरुवात म्युझियम येथून सुरू होऊन गेट वे ऑफ इंडिया, नरिमन पॉइंट, मरिन ड्राइव्ह, चर्चगेट, महर्षी कर्वे रोड, गिरगाव चर्च, प्रार्थना समाज, ताडदेव, मुंबई सेंट्रल, भायखळा, जिजामाता उद्यान, लालबाग आणि परत भायखळा, मुंबई सेंट्रल, ताडदेव, चर्नी रोड, मरिन लाईन्स, मेट्रो सिनेमा, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पुन्हा म्युझियमपर्यंत ही बससेवा ‘हॉप ऑन हॉप ऑफ’ या पद्धतीने कार्यान्वित असेल. त्या बससेवेसाठी वरच्या व खालच्या मजल्यासाठी अनुक्रमे १५० रुपये आणि ७५ रुपये असे तिकीटदर असतील. अधिक माहितीसाठी प्रवाशांनी कृपया बेस्टच्या हेल्पलाइन क्रमांक १८२२७५५० या क्रमांकावर संपर्क साधावा.

Sydney Mass Shooting: सिडनीतील बॉन्डी बीचवर भीषण गोळीबार; १० जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

अमेरिकेच्या रोड आयलंडमधील ब्राउन विद्यापीठात गोळीबार; २ जणांचा मृत्यू, संशयिताचा शोध सुरू

अजित पवारांनी हेडगेवार स्मृतीस्थळाची भेट टाळली, आनंद परांजपेंचे स्पष्टीकरण; म्हणाले...

सिडकोच्या घरांच्या किमतीत १० टक्के कपात; नवी मुंबईतील १७ हजार घरांची लॉटरी लवकरच

BMC Election : मुंबई मनपा निवडणुकीची उद्या घोषणा?