प्रातिनिधिक छायाचित्र 
मुंबई

Mount Mary Fair: ‘माऊंट मेरी’ यात्रे निमित्त बेस्टच्या जादा बसगाड्या

वांद्रे (पश्चिम) येथील 'माऊंट मेरी यात्रा' रविवारपासून सुरू होत असून, ही यात्रा पुढील रविवार म्हणजे १५ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.

Swapnil S

मुंबई : वांद्रे (पश्चिम) येथील 'माऊंट मेरी यात्रा' रविवारपासून सुरू होत असून, ही यात्रा पुढील रविवार म्हणजे १५ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. यात्रेला भेट देणारे प्रवासी मोठ्या प्रमाणावर वांद्रे स्थानक (प) येथे उपनगरीय रेल्वेने येऊन तेथुन उपक्रमाच्या बसगाड्यांचा लाभ घेतात. ही बाब विचारात घेऊन यावर्षीही 'माऊंट मेरी' यात्रे निमित्त बेस्ट उपक्रमातर्फे संपूर्ण आठवडा १२१ अतिरिक्त बसगाड्या वांद्रे स्थानक (प) आणि हिलरोड दरम्यान प्रवर्तित करण्यात येणार आहेत.

या व्यतिरिक्त बसमार्ग क्र. सी-७१, ए-२०२, ३२१ मर्या, ए-३७५, ४२२, ४७३ व सी-५०५ या बसमार्गावर अतिरिक्त बसगाड्या प्रवर्तित करण्यात येतील.

माऊंट मेरी' चर्च येथे तसेच फादरॲग्नेल आश्रम या परिसरामध्ये यात्रेकरीता येणा-या प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे बसगाड्यांचे प्रवर्तन 'माऊंट मेरी' चर्चपर्यंत करणे शक्य नसते. परिणामी या अतिरिक्त बसगाड्या वांद्रे रेल्वे स्थानक (प) आणि हिलरोड उद्यान दरम्यान कार्यान्वित करण्यात येतील. या व्यतिरिक्त वांद्रे परिसरातून प्रवर्तित होणा-या उपक्रमाच्या नियमित बसमार्गावर देखील अतिरिक्त बसगाड्या प्रवर्तित करण्यात येतील.

BMC Election : आज मतदान; मुंबईच केंद्रस्थानी; बोटावर उमटणार लोकशाहीचा ठसा, तरुणाईमध्ये उत्साहाचे वातावरण

मतदानानंतर लगेच पुसली जाते बोटावरची शाई; मनसेच्या महिला उमेदवाराचा दावा; काँग्रेसच्या सचिन सावंतांनी तर प्रात्यक्षिकच दाखवलं - Video

BMC Elections 2026: 'व्होटर स्लिप्स'चा गोंधळ; अनेक मतदार मतदान न करताच परतले

Thane Election : व्होटर स्लिपमध्ये घोळ; नाव, अनुक्रमांक बरोबर; पत्ते मात्र बदलले

BMC Elections 2026: मुंबईत मतदानाला झाली सुरूवात; आज काय सुरू, काय बंद?