मुंबई

१२ दिवसांत सव्वादोन लाख वाहनांची सफर; कोस्टल रोडच्या एका मार्गिकेला वाहनधारकांची पसंती

डिसेंबर २०२३ पर्यंत संपूर्ण कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत आणण्याचे नियोजन पालिका प्रशासनाने केले होते; मात्र तांत्रिक कारणामुळे प्रकल्पाच्या कामाला वेळ लागला. परंतु दक्षिण मुंबईत जाणारी थडानी जंक्शन वरळी ते मरीन ड्राईव्हदरम्यान एका मार्गिकेचे काम पूर्ण झाले आणि १२ मार्च रोजी एक मार्गिक वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे.

Swapnil S

मुंबई : ७० मीटर खोल समुद्रात भुयारी मार्गात सफर करायचा अनुभव घेण्यासाठी कोस्टल रोडच्या दक्षिण मुंबईतील थडानी जंक्शन वरळी ते मरीन ड्राईव्हदरम्यान वाहनधारकांनी पसंती दिली आहे.

१२ ते २७ मार्च दरम्यान २ लाख २५ हजार ५५८ वाहनधारकांनी थडानी जंक्शन वरळी ते मरीन ड्राईव्हदरम्यान सफर केला. दरम्यान, शनिवार व रविवारी एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली ठेवा, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.

मुंबईतील वाहतूककोंडी फोडण्यासाठी कोस्टल रोड प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ऑक्टोबर २०१८ मध्ये प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ झाला. कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामाला गती येते तोच मुंबईत मार्च २०२० मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आणि मुंबईला ब्रेक लागला. कोरोना काळापासून कोस्टल रोडचे काम संथगतीने सुरू होते; मात्र कोरोनावर नियंत्रण मिळवले आणि कोस्टल रोडच्या कामाला वेग आला.

डिसेंबर २०२३ पर्यंत संपूर्ण कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत आणण्याचे नियोजन पालिका प्रशासनाने केले होते; मात्र तांत्रिक कारणामुळे प्रकल्पाच्या कामाला वेळ लागला. परंतु दक्षिण मुंबईत जाणारी थडानी जंक्शन वरळी ते मरीन ड्राईव्हदरम्यान एका मार्गिकेचे काम पूर्ण झाले आणि १२ मार्च रोजी एक मार्गिक वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे.

१२ ते २७ मार्च या १२ दिवसांत दोन लाख २५ हजार ५५८ वाहनधारकांनी वरळी ते मरीन ड्राईव्हदरम्यान सफर केल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, सकाळी १० ते १२ आणि दुपारी ३ ते ४ दरम्यान या वेळेत प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या सर्वात जास्त असल्याचे दिसून येत आहे.

१२ दिवसांत वाहनांचा प्रवास!

  • सकाळी ८ ते ९ - १२,२५२

  • सकाळी ९ ते १० - २१,८४७

  • सकाळी १० ते ११ - २५,३७०

  • सकाळी ११ ते १२ - २२,६२०

  • दुपारी १२ ते १ - २०,९१०

  • दुपारी १ ते २ - १६,८३६

  • दुपारी २ ते ३ - १८,६४८

  • दुपारी ३ ते ४ - २१,३६४

  • सायंकाळी ४ ते ५ - १८,८९४

  • सायंकाळी ५ ते ६ - १६,९८४

  • सायंकाळी ६ ते ७ - १५,०८७

  • सायंकाळी ७ ते ८ - १४,७४६

  • एकूण - २,२५,५५८

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत