मुंबई

मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी भूषण गगराणी

Swapnil S

मुंबई : मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी भूषण गगराणी यांची नियुक्ती झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आयुक्त तसेच इतर अधिकारी बदलण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

महपालिका आयुक्त इक्बालसिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे व पी. वेलारसू यांची बदली करावी आणि त्यांच्या जागी नवीन नियुक्ती मंगळवारी सायंकाळपर्यंत करावी, असे आदेश निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिले होते. महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त ही पदे निवडणुकीशी संबंधित आहेत आणि या पदावर तीन वर्षे वा त्यापेक्षा अधिक कार्यकाळ झालेल्या अधिकाऱ्यांची बदली करावी, असे आयोगाने स्पष्ट केले होते. त्यानंतर मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदासाठी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, बेस्टचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर आणि एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी या तीन जणांची नावे राज्य सरकारने मंगळवारी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठविली होती. तीन जणांच्या नावांचे पॅनेल निवडीसाठी पाठविणे आवश्यक होते. त्यानंतर आयोगाच्या आदेशाने भूषण गगराणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भूषण गगराणी हे १९९० च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणूनही त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच त्यांच्याकडे नगरविकास, जलसंपदा आणि मराठी भाषा या विभागांची जबाबदारीदेखील होती.

सौरभ राव ठाण्याचे, तर शिंदे नवी मुंबईचे आयुक्त

भूषण गगराणी यांच्यासोबतच ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून सौरभ राव यांची तर नवी मुंबई महापालिका आयुक्तपदी कैलाश शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस