मुंबई

बिग बुल राकेश झुनझुनवालांनी उभारले पाच हजारांच्या गुंतवणुकीतून ४४ हजार कोटींचे साम्राज्य!

एक यशस्वी व्यावसायिक असण्यासोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आहेत

प्रतिनिधी

भारतीय शेअर बाजारातील बिग बुल राकेश झुनझुनवाला यांनी १९८५ मध्ये अवघ्या ५ हजार रुपयांपासून शेअर बाजारात गुंतवणूक सुरू केली. ३७ वर्षांत त्यांचे व्यवसाय साम्राज्य ४४ हजार कोटी रुपयांवर पोहोचले. एक यशस्वी व्यावसायिक असण्यासोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आहेत. कधी ते व्हील चेअरवर बसून कजरारे-कजरारे या गाण्यावर नाचताना दिसायचे. तर कधी बायकोच्या बांगड्या विकून गुंतवणूक करण्याविषयी ते नेहमी बोलत असत.

त्यांचा जन्म ५ जुलै १९६० रोजी हैदराबाद येथे झाला. त्यांचे कुटुंब राजस्थानमधील झुंझुनू येथील आहे. झुनझुनवाला यांचा जन्म मारवाडी कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील राधेश्यामजी झुनझुनवाला हे आयकर अधिकारी होते. राधाकिशन दमानी हे राकेश झुनझुनवाला यांचे गुरू आहेत. सध्या दमाणी हे डी-मार्टचे मालक आहेत. १९८५ मध्ये झुनझुनवाला कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांनी शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. त्यावेळी सेन्सेक्स १५० अंकांवर होता. आज तो ६० हजारांच्या पुढे गेला आहे. झुनझुनवाला यांची सर्वात महत्त्वाची होल्डिंग टाटाची घड्याळ आणि दागिने कंपनी टायटनमध्ये आहे. यासोबतच झुनझुनवाला यांची स्टार हेल्थ इन्शुरन्स, मेट्रो ब्रँड्स आणि कॉनकॉर्ड बायोटेकसह इतर अनेक कंपन्यांमध्ये भागीदारी आहे. त्यांच्याकडे स्पाइसजेट आणि जेट एअरवेजमध्ये १-१ टक्के हिस्सा आहे.

ओला दुष्काळ जाहीर करण्यास मुख्यमंत्री फडणवीसांचा नकार; पण सर्व सवलती लागू, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन

"२६/११ नंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणार होतो, पण...; पी. चिदंबरम यांचा गौप्यस्फोट

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले! क्वेट्टामध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट, १० ठार, भयानक व्हिडिओ समोर

Dombivali : झोपेतच सर्पदंश! ३ वर्षांच्या चिमुकलीसह मावशीचा मृत्यू; KDMC रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत