मुंबई

मराठीविरोधात गरळ ओकणाऱ्या भाजप खासदाराने ठाकरे बंधूंना डिवचले; BMC निकाल बघून म्हणाले, "मी मुंबईत येऊन उद्धव-राज...

मराठीविरोधात गरळ ओकल्यामुळे टीकेचे धनी ठरलेले भाजपचे खासदार निशिकांत दुबे पुन्हा चर्चेत आहेत. मुंबई महापालिकेचे निकाल यायला सुरूवात होताच आणि महापालिकेत भाजप-शिवसेनेचा महापौर बसणार असे चित्र दिसायला लागताच दुबे यांनी पुन्हा एकदा ठाकरे बंधूंना डिवचले आहे.

Krantee V. Kale

मराठीविरोधात गरळ ओकल्यामुळे टीकेचे धनी ठरलेले भाजपचे खासदार निशिकांत दुबे पुन्हा चर्चेत आहेत. मुंबई महापालिकेचे निकाल यायला सुरूवात होताच आणि महापालिकेत भाजप-शिवसेनेचा महापौर बसणार असे चित्र दिसायला लागताच दुबे यांनी पुन्हा एकदा ठाकरे बंधूंना डिवचले आहे.

'मी मुंबईत येऊन उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची भेट घेईन' असे दुबे म्हणाले आहेत. एवढे एकच वाक्य लिहून त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली. त्यानंतर अजून एका पोस्टमध्ये, 'उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या अस्वस्थ होण्याचे दिवस आले आहेत', असेही ते म्हणाले. पुढे, मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताच्या एकतेचा विजय झाला. मुंबईला मजबूत बनवण्यात मालक आणि मजूर सर्वांचेच योगदान आहे. विकासयुक्त, विचारयुक्त आणि भयमुक्त महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन, अमित शाह तर रणनीतीमध्ये माहिर आहेतच असेही त्यांनी नमूद केले.

मराठीविरोधात ओकली होती गरळ

गेल्या वर्षी जुलै महिन्यात वरळी येथे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या मराठी विजयी मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी मीरा-भाईंदर येथे एका व्यापाऱ्यावर मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर वक्तव्य केलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की, "मारहाण करतानाचा व्हिडीओ काढू नका." या विधानाचा संदर्भ घेऊन निशिकांत दुबे यांनी थेट राज ठाकरे यांना आव्हान देत , “बिहार, यूपी किंवा तामिळनाडूमध्ये येऊन बघा, उचलून आपटू.” असं म्हटलं होतं. इतक्यावरच न थांबता, मराठी माणसांविषयी अत्यंत अपमानास्पद भाषा वापरत पुढे, मराठी लोक कुणाची भाकर खातायत? मराठी लोकांकडे कोणते उद्योग आहेत? आमच्या पैशांवर तुम्ही जगताय, असंही निशिकांत दुबे म्हणाले होते. त्यानंतर बराच गदारोळ झाला होता.

Maharashtra Election Results Live : मुंबईत ठाकरे बंधूंना, पुण्यात दोन्ही पवारांना धक्का; २९ पैकी २१ महापालिका 'भाजपमय'!

ठाकरे बंधूंना धक्का? BMC सह राज्यातील बहुतांश महापालिका होणार 'भाजपमय'; विविध 'एक्झिट पोल'मधील अंदाज

Thane : अनेक मतदान केंद्रांवर EVM बिघाड; मशीन बंद, सिरीयल क्रम चुकले; मतदारांना मनस्ताप

पुणे - पिंपरीमध्ये मतदानात मोठा गोंधळ!मतदारयादीतील नावे गायब, ईव्हीएम बिघाड, बोगस मतदानाचे आरोप

शाई पुसली, गोंधळ वाढला... व्हायरल व्हिडिओची राज्य निवडणूक आयोग चौकशी करणार; कारवाईचा प्रशासनाचा इशारा