मुंबई : विलेपार्ले परिसरातील एक कथित अनधिकृत जैन मंदिर बृहन्मुंबई महानगरपालिकेने पाडले. यानंतर समुदायाच्या सदस्यांनी ही कारवाई अनुचित असल्याचे म्हटले आहे.
कांबळीवाडी येथील नेमिनाथ सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या आत असलेल्या मंदिराचे किंवा 'चैतालयाचे' विश्वस्त अनिल शाह यांनी सांगितले की ते १६ एप्रिल रोजी पाडण्यात आले.
हे मंदिर १९६० च्या दशकातील असून पूर्वी पालिकेच्या परवानगीने तिचे नूतनीकरण करण्यात आले होते, असे मंदिराकडून वृत्तसंस्थेला सांगण्यात आले.
अशा बांधकामांना नियमित करता येते, असे सांगणारा एक सरकारी ठराव आहे. नियमितीकरणासाठी तुम्हाला फक्त बीएमसीला प्रस्ताव सादर करावा लागेल जो आम्ही सादर केला होता, असा दावा त्यांनी केला.
काही धार्मिक पुस्तके आणि मंदिराच्या साहित्याचेही विध्वंस करण्यात आला, असा आरोप त्यांनी केला, ही कारवाई स्थानिक हॉटेल व्यावसायिकाच्या आदेशावरून करण्यात आली असा आरोप त्यांनी केला.
शनिवारी के-पूर्व वॉर्ड कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्याचे नियोजन समुदायाच्या सदस्यांनी केले आहे, असे त्यांनी सांगितले. महानगरपालिकेच्या प्रवक्त्याने महानगरपालिकेची बाजू विचारण्यासाठी आलेल्या कॉल आणि संदेशांना प्रतिसाद दिला नाही.