मुंबई

BMC Election : धारावीत भाजपला अपयश; ठाकरे गटाचे वर्चस्व, काँग्रेसमधून आलेल्या रवी राजा यांचाही पराभव

धारावीत काँग्रेसलाही फटका बसला असून या निवडणुकीत ठाकरे गटाचे वर्चस्व पाहण्यास मिळाले. तर मनसेला धारावीत एकही जागा जिंकता आली नाही.

Swapnil S

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत धारावी विधानसभा मतदारसंघातील एकही वॉर्ड भाजपाला जिंकता आला नाही. धारावीत काँग्रेसलाही फटका बसला असून या निवडणुकीत ठाकरे गटाचे वर्चस्व पाहण्यास मिळाले. तर मनसेला धारावीत एकही जागा जिंकता आली नाही.

धारावी पुनर्विकासाचे वारे जोरदार सुरु आहे. हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी भाजपा आग्रही आहे. त्यानुसार भाजपाने यंदा धारावीतून तीन उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते. यामध्ये काँग्रेसमधून भाजपामध्ये आलेले दोन दिग्गज नेतेही निवडणूक रिंगणात उतरले होते. तसेच शिंदे गटानेही येथे जोरदार तयारीनिशी निवडणूक लढवली. मात्र या निवडणुकीत धारावीत भाजपा आणि शिंदे गटाला यामध्ये अपयश आले. शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांनी आपल्या भावजया यांना १८३ वॉर्ड मधून निवडणूक रिंगणात उतरवले होते. यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही प्रचार केला.

धारावी विधानसभा क्षेत्रातील निकाल

  • वॉर्ड १८३ - आशा काळे (काँग्रेस)

  • वॉर्ड १८४ - साजिदाबी बब्बू खान (काँग्रेस)

  • वॉर्ड १८५ - टी. एम. जगदीश (शिवसेना ठाकरे)

  • वॉर्ड १८६ - अर्चना शिंदे (शिवसेना ठाकरे)

  • वॉर्ड १८७ - जोसेफ कोळी (शिवसेना ठाकरे)

  • वॉर्ड १८८ - भास्कर शेट्टी (शिवसेना शिंदे)

  • वॉर्ड १८९ - हर्षला मोरे (शिवसेना ठाकरे)

BMC Election : मुंबईच्या चाव्या महायुतीकडे; महापालिका निसटली, उद्धव ठाकरेंनी दिली कडवी झुंज

Maharashtra Local Body Election Results : राज्यात भाजपच ‘मोठा’ भाऊ; २९ पैकी २३ महापालिकांवर महायुतीचा कब्जा

BMC Election : मुंबईचे महापौरपद भाजपकडे तर शिंदेंचा उपमहापौर? २८ जानेवारीला महापौरपदाची निवडणूक

नवी मुंबईत शिंदेंचा ‘टांगा पलटी’; गणेश नाईकांनी 'करून दाखवलं!'

Thane : स्वबळाचा नारा काँग्रेसच्या अंगलट; ६० उमेदवारांना ‘भोपळा’ही फोडता आला नाही