संग्रहित छायाचित्र
मुंबई

BMC निवडणुकीच्या तयारीला वेग; राज्य निवडणूक आयोगाकडून समाधान व्यक्त

बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकपूर्व तयारीचा आढावा महाराष्ट्र राज्ये निवडणूक आयुक्तू दिनेश वाघमारे यांनी शुक्रवारी महापालिकेत आयोजित बैठकीत घेतला. यावेळी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केलेली पूर्वतयारी परिपूर्ण असल्याचे सांगत राज्य निवडणूक आयोगाने समाधान व्यक्त केले.

Swapnil S

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकपूर्व तयारीचा आढावा महाराष्ट्र राज्ये निवडणूक आयुक्तू दिनेश वाघमारे यांनी शुक्रवारी महापालिकेत आयोजित बैठकीत घेतला. यावेळी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केलेली पूर्वतयारी परिपूर्ण असल्याचे सांगत राज्य निवडणूक आयोगाने समाधान व्यक्त केले.

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, राज्या निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी, कोकण विभागीय आयुक्तं डॉ. विजय सूर्यवंशी, मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल सूद गोयल, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते. विशेष कार्य अधिकारी (निवडणूक) विजय बालमवार यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे निवडणूकपूर्व तयारी कामांची माहिती दिली.

राज्य निवडणूक आयुक्त वाघमारे म्हणाले की, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने निवडणुकीसाठी केलेली पूर्वतयारी परिपूर्ण आहे. मतदान केंद्रांवरील सुविधा वाढवून त्याची प्रभावी जनजागृती करण्यात यावी, जेणेकरून मतदानाची टक्केवारी वाढेल. मागील सार्वत्रिक मनपा निवडणुकीदरम्यान आलेल्या अडचणींचे निराकरण कशा प्रकारे झाले, याचा विचार करून यंदा अधिक सक्षम उपाययोजना राबवाव्यात. मतदान प्रक्रिया सुरळीत व पारदर्शक पार पडावी, यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलावीत. सर्वांनी पारदर्शक व निर्भयपणे कामकाज करावे. विविध यंत्रणांमध्ये योग्य समन्वय साधून कामकाज सुरळीत व प्रभावीपणे पूर्ण होईल, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश वाघमारे यांनी दिले.

या कामांचा घेतला आढावा

बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील एकूण मतदार संख्या व मतदान केंद्र, मतदार यादी विभाजन, प्रस्तावित मतदान केंद्रांचे वर्गीकरण, आवश्याक मतदान यंत्रे, मतदान यंत्रे साठवणूक व्यनवस्थाद, निवडणूक साहित्य, मतदान केंद्रावरील सोयी-सुविधा, निवडणुकीसाठी आवश्यतक अधिकारी-कर्मचारी वर्ग आदी विविध विषयांचा दिनेश वाघमारे यांनी आढावा घेतला.

Pune Ganesh Visarjan 2025 : पुण्यात मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीत भक्तांचा उत्साह; पारंपरिक जल्लोषात विसर्जन

पालखी निघाली राजाची...लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ; भाविकांना अश्रू अनावर | Video

Mumbai : मुंबापुरी गणेश विसर्जनासाठी सज्ज; मुंबईच्या वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद

Pune : गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पुणेकर सज्ज; वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद

Mumbai : मित्राला अडकवण्यासाठी मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी; नोएडामधून ज्योतिषाला अटक