Photo : X (@ShivSenaUBT_)
मुंबई

BMC Election : ठाकरे बंधूंची तोफ आज शिवतीर्थावर धडाडणार

मुंबई मनपाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतील पहिलीच संयुक्त सभा दादरच्या शिवाजी पार्क येथे रविवारी होणार आहे. ठाकरे बंधूंकडून मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबई मनपाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतील पहिलीच संयुक्त सभा दादरच्या शिवाजी पार्क येथे रविवारी होणार आहे. ठाकरे बंधूंकडून मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे.

महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असून अंतिम टप्प्यात प्रचार सभा होत आहेत. मुंबई मनपा काबीज करण्यासाठी दोन्ही पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यामुळे प्रचार सभेसाठी शिवाजी पार्क मैदान मिळण्यासाठी ठाकरे बंधू आणि शिवसेना-भाजप युती यांच्याकडून मुंबई महापालिकडे अर्ज केले होते. त्यानुसार महापालिकेने त्यांच्या सभांना परवानगी दिली आहे. मात्र, ठाकरे बंधूंच्या सभा होऊ नयेत, म्हणून वकील गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध दर्शवित निवडणूक आयोग, महापालिका आणि स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. पुन्हा एकदा सदावर्ते यांनी ठाकरेंच्या सभेलाही विरोध केल्याने निवडणूक आयोग, महापालिका पोलिस काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.

शिवसेना (उबाठा)-मनसेची एकत्रित सभा

मुंबई मनपात राजकीय समीकरणे बदलली आहेत. शिवसेनेचे दोन गट झाले आहेत. हे दोन्ही गट निवडणुकीत आमनेसामने येणार आहेत. शिवाय शिवसेना (ठाकरे) व मनसे प्रथमच एकत्र येऊन निवडणूक लढवत आहेत. या दोन्ही पक्षांची सभा एकत्रित होणार आहे.

२६५ तालुक्यांत दुष्काळ; ७४ टक्के राज्य दुष्काळाच्या छायेत; कर्जवसुलीला स्थगिती, परीक्षा शुल्क माफ, नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश

निवडणूक आयोगाचा सारवासारवीचा प्रयत्न; SIR चे सर्व निर्णय सर्वानुमते

बाप्पा...पुढच्या वर्षी लवकर या! १२ दिवसांच्या ३६ हजारांहून अधिक मूर्तींचे विसर्जन; गुलालाची उधळण, ढोल-ताशांच्या गजराने मुंबई दुमदुमली

आजचे राशिभविष्य, २७ सप्टेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

डाएटवाल्यांसाठी खास! नाश्त्यात बनवा कुरकुरीत पालक ओट्स टिक्की; १० मिनिटांत होईल तयार