मुंबई

सफाई कामगारांना ३०० चौरस फुटांचे घर; चेंबूर येथे BMC बांधणार ५८० सदनिका, आश्रय योजनेचा दुसरा टप्पा राबवणार

पी.एल. लोखंडे मार्गावरील चेंबूर गावातील सीटीएस क्रमांक ७८८ येथील भूखंडावर हा प्रकल्प राबवण्यात येणार असून एकूण ३०० चौरस फूट क्षेत्रफळाच्या ५८० सदनिका उभारण्यात येणार आहेत.

Swapnil S

मुंबई : सफाई कामगारांना हक्काचे घर मिळावे, यासाठी आश्रय योजनेचा दुसरा टप्पा राबवण्यात येणार आहे. चेंबूर येथील पी. एल. लोखंडे मार्गावर मुंबई महापालिकेच्या सफाई कामगारांच्या घरांचा पुनर्विकास प्रकल्प आता मार्गी लागणार आहे. एकूण ३०० चौरस फूट क्षेत्रफळाच्या ५८० सदनिका उभारण्यात येणार आहेत. प्रीफॅब्रिकेशन तंत्रज्ञानाचा वापर करून जलद व दर्जेदार बांधकाम करण्याच्या उद्देशाने टर्नकी पद्धतीने कंत्राटदार नियुक्ती करण्यात येणार आहेत.

पी.एल. लोखंडे मार्गावरील चेंबूर गावातील सीटीएस क्रमांक ७८८ येथील भूखंडावर हा प्रकल्प राबवण्यात येणार असून एकूण ३०० चौरस फूट क्षेत्रफळाच्या ५८० सदनिका उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पासाठी महापालिकेकडून ई-निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.

मुंबई पालिकेत सद्या सुमारे २८ हजार सफाई कामगार कार्यरत आहेत. या कामगारांसाठी पालिका वसाहतींमध्ये अवघी सहा हजार सेवा सदनिका आहेत. सेवेत असलेले बहुतांशी सफाई कामगार हे झोपडपट्टीत राहत असून त्यांना मालकी हक्काची घरे देण्याची मागणी केली जात होती. त्यांच्यासाठी नेमलेल्या आयोगांकडूनही घरांची शिफारस करण्यात आली होती. ती राज्य सरकार व पालिकेकडून मान्य करण्यात आली आहे.

१८० दिवसांत प्रकल्प

या निविदेसाठी ३५ हजार ६९५ रुपये इतके निविदा शुल्क निश्चित करण्यात आले असून त्यात ३० हजार २५० रुपये मूळ शुल्कासह ९ टक्के एसजीएसटी व ९ टक्के सीजीएसटी समाविष्ट आहे तसेच निविदा सुरक्षा ठेव (ईएमडी) म्हणून १ कोटी ३५ लाख रुपये इतकी रक्कम निश्चित करण्यात आली आहे. प्रकल्पाचा कालावधी १८० दिवसांचा असून निविदा वैधता कालावधीही त्यानुसार ठेवण्यात आला आहे.

ई-निविदा प्रक्रिया सुरू

मुंबई महापालिकेच्या आश्रय योजनेंतर्गत चेंबूर परिसरात सफाई कर्मचाऱ्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ई-निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रीफॅब्रिकेशन तंत्रज्ञानाचा वापर करून जलद व दर्जेदार बांधकाम करण्याच्या उद्देशाने टर्नकी पद्धतीने कंत्राटदार नियुक्ती करण्यात येणार आहे. निविदा प्रसिद्ध व विक्रीची प्रक्रिया २८ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ११ वाजल्यापासून सुरू होणार आहे. निविदा सादर करण्याची अंतिम मुदत २४ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत असून लिफाफा ‘ए’, ‘बी’ आणि ‘सी’ (ऑनलाइन) स्वरूपात सादर करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.

Mumbai : शीव पूल १५ जुलैपर्यंत वाहतुकीसाठी खुला होणार; अतिरिक्त पालिका आयुक्तांनी केली पाहणी

Budget 2026 : स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प कधी मांडला? उद्या सादर होणारं बजेट कितवं? जाणून घ्या

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा; अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीसाठी सुधारित योजना

ठाणे शहरात उभारले जाणार १९ ई-व्हेईकल चार्जिंग स्टेशन्स; प्रमुख चौकांमध्ये उपलब्ध होणार सुविधा; पीपीपी तत्त्वावर प्रकल्पाला मंजुरी

Mumbai : ...ती भ्रूणहत्याच ठरेल; न्यायालयाने नाकारली गर्भपाताची परवानगी; खर्च राज्यशासनाने करण्याचे आदेश