Mumbai : इनोव्हा खरेदीचे स्थायी समितीत पडसाद; भाजप-काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप 
मुंबई

Mumbai : इनोव्हा खरेदीचे स्थायी समितीत पडसाद; भाजप-काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप

मुंबई महापालिकेतील उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते तसेच स्थायी, सुधार आणि शिक्षण समिती अध्यक्षांसाठी सुमारे दीड कोटी रुपये खर्चून सहा टोयोटा इनोव्हा क्रिस्टा गाड्या खरेदी करण्याची हालचाल सुरूच आहे. गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावावर पडसाद उमटले.

Mayuri Gawade

मुंबई : मुंबई महापालिकेतील उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते तसेच स्थायी, सुधार आणि शिक्षण समिती अध्यक्षांसाठी सुमारे दीड कोटी रुपये खर्चून सहा टोयोटा इनोव्हा क्रिस्टा गाड्या खरेदी करण्याची हालचाल सुरूच आहे. गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावावर पडसाद उमटले. या मुद्द्यावर काँग्रेस आणि सत्ताधारी भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगले. तर नव्या कोऱ्या गाड्या खरेदीसाठी सर्वपक्षीयाची सहमती असल्याचा दावा भाजपने केला.

महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते अश्रफ आझमी यांनी या प्रस्तावाला तीव्र विरोध करताना, आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या महापालिकेने महागड्या गाड्यांवर खर्च करणे योग्य नसल्याचे सांगितले. नागरिकांसाठीच्या विकासकामांवर आणि मूलभूत सुविधांवर भर देण्याची गरज असताना अशा खर्चाला प्राधान्य देणे अयोग्य असल्याचे त्यांनी नमूद केले. महापालिकेने आर्थिक शिस्त पाळण्याची गरज असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.

यावर भाजपने तत्काळ पलटवार करत, नव्या गाड्या खरेदी करण्याचा निर्णय सर्वपक्षीय बैठकीत एकमताने घेण्यात आल्याचा दावा केला. भाजपचे गटनेते गणेश खणकर यांनी, भविष्यात अशा निर्णयांवर सर्व उपस्थित सदस्यांच्या स्वाक्षऱ्या घेऊनच मंजुरी दिली जाईल, जेणेकरून नंतर अशाप्रकारचे वाद निर्माण होणार नाहीत, असे सांगितले. स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनीही या प्रस्तावाचे समर्थन केले आहे.

भाडेतत्त्वावर गाड्या घेण्याचा प्रस्ताव - गणेश खणकर

“पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना भाडेतत्त्वावर (वेट लीज) गाड्या दिल्या आहेत. १७ उपायुक्तांना वेट लीजवर गाड्या देण्याचा प्रस्ताव आहे. मुंबई महापालिकेत सत्ता आल्यापासून काही वेळाच गाडीचा वापर करतो. अन्यथा मेट्रोने ये-जा करतो. मला बंगला नको, गाडी नको, जे मिळाले त्यात मी खुश आहे. मात्र विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांना नवीन गाडी पाहिजे, अशी त्यांची मागणी होती. मात्र आज त्यांनी पलटी मारली आहे,” असा आरोप सभागृह नेते गणेश खणकर यांनी केला.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Punjab : फेसबुक लाइव्ह सुरू असतानाच गोळीबार; ड्रग्सविरोधी कार्यकर्ते परविंदर झोटा यांची हत्या, Video

CJP Protest : जंतर-मंतरवर प्रवेश करताच दिल्ली पोलिसांची कारवाई; सौरव दास, आशुतोष रांकांसह अजिंक्य शिंदे ताब्यात

Mumbai : माटुंगा रेल्वेच्या २२ एकर जागेवर धारावी पुनर्वसन घरांचे भूमिपूजन

Nalasopara : लग्नाचं आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार; आणखी ७० ते ८० महिलांच्या शोषणाचाही आरोप

Mumbai : कारवाईआधी राज्य सरकारशी चर्चा करा! झोपड्यांबाबत खासदारांची विभागीय बैठक; रेल्वेला सूचना