Mumbai : खड्ड्यांची तक्रार आता एका क्लिकवर; नागरिकांसाठी BMC ची नवी सुविधा Photo: PTI
मुंबई

Mumbai : खड्ड्यांची तक्रार आता एका क्लिकवर; नागरिकांसाठी BMC ची नवी सुविधा

मुंबईतील खड्डे, कचरा, पाणीपुरवठा आणि इतर नागरी समस्यांच्या तक्रारी आता MyBMC MARG ॲपवरून करता येणार आहेत. BMC ने Pothole QuickFix ॲप या एकाच प्लॅटफॉर्ममध्ये समाविष्ट केले आहे.

Mayuri Gawade

मुंबईतील खड्डे, कचरा, पाणीपुरवठा, गटार, रस्ते यांसारख्या नागरी समस्यांबाबत तक्रार करणे आता अधिक सोपे होणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) खड्ड्यांच्या तक्रारींसाठी वापरले जाणारे 'Pothole QuickFix' ॲप आता 'MyBMC MARG' या एकत्रित तक्रार निवारण ॲपमध्ये समाविष्ट केले आहे.

यामुळे नागरिकांना वेगवेगळ्या समस्यांसाठी स्वतंत्र ॲप वापरण्याची गरज राहणार नाही. आता सर्व प्रकारच्या नागरी तक्रारी एकाच ॲपद्वारे नोंदवता येणार आहेत.

खड्ड्यांसह ११४ प्रकारच्या तक्रारींची सुविधा

'MyBMC MARG' हे BMC चे तक्रार निवारण ॲप असून त्यामध्ये तब्बल ११४ प्रकारच्या नागरी तक्रारी नोंदवण्याची सुविधा आहे. यामध्ये खड्डे, कचरा व्यवस्थापन, गटार समस्या, पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरुस्ती, उद्याने, सार्वजनिक आरोग्य, कीटक नियंत्रण, अतिक्रमण आणि रस्त्यावरील दिवे यांसारख्या तक्रारींचा समावेश आहे.

फोटो अपलोड करून करता येणार तक्रार

नागरिकांना तक्रार करताना संबंधित ठिकाणाचा फोटो, अचूक लोकेशन आणि इतर माहिती अपलोड करता येणार आहे. तक्रार नोंदवल्यानंतर तिची स्थिती, संबंधित विभागाने केलेली कारवाई आणि तक्रार निकाली निघेपर्यंतची माहितीही ॲपवर पाहता येणार आहे.

BMC च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या सुविधेमुळे तक्रार निवारण प्रक्रिया अधिक पारदर्शक, जलद आणि नागरिकाभिमुख होणार आहे.

नागरिकांना BMC चे आवाहन

महापालिकेने मुंबईकरांना खड्डे किंवा इतर नागरी समस्यांबाबत तक्रार करताना स्पष्ट फोटो आणि अचूक ठिकाणाची माहिती देण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे संबंधित विभागाला तातडीने कारवाई करणे सोपे होईल.

'MyBMC MARG' ॲप अँड्रॉइड आणि iOS या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असून नागरिकांनी सर्व नागरी तक्रारींसाठी या ॲपचा वापर करावा, असे आवाहन BMC ने केले आहे.

Gwalior Accident : नवरात्रीत शीतला माता मंदिराबाहेर भीषण दुर्घटना! भरधाव ट्रकने भाविकांना चिरडलं; १४ जणांचा मृत्यू

Mumbai Crime: आई-वडील झोपेत असताना CSMT स्थानकातून चिमुकलीचं अपहरण; संशयित महिला CCTV मध्ये कैद

घटनादुरुस्ती विधेयकावर घाईने निर्णय नको; खर्गे यांचे पंतप्रधानांना पत्र, सीमांकन प्रस्तावांवर सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचीही मागणी

५ हजारांचे मूल्य कसे समजणार? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर पलटवार

Mumbai : पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय; दुर्गामूर्तीचे फोटो, व्हिडीओ काढण्यास मनाई