एमएमसी नोंदणीविरोधातील आंदोलन तीव्र; पालिका रुग्णालयांतील नियमित आरोग्यसेवा बंद, रुग्णसेवेवर परिणाम  
मुंबई

Mumbai : एमएमसी नोंदणीविरोधातील आंदोलन तीव्र; पालिका रुग्णालयांतील नियमित आरोग्यसेवा बंद, रुग्णसेवेवर परिणाम

बृहन्मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (बीएमसी-मार्ड) यांनी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडून (एमएमसी) सीसीएमपी पात्रता असलेल्या बीएचएमएस डॉक्टरांच्या नोंदणी प्रक्रियेविरोधातील आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.

Swapnil S

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (बीएमसी-मार्ड) यांनी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडून (एमएमसी) सीसीएमपी पात्रता असलेल्या बीएचएमएस डॉक्टरांच्या नोंदणी प्रक्रियेविरोधातील आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारपासून मुंबई पालिकेच्या केईएम, लोकमान्य टिळक (सायन), बीवायएल नायर आणि डॉ. आर. एन. कूपर रुग्णालयांमध्ये सर्व नियमित आरोग्य व शैक्षणिक सेवा बंद ठेवण्यात येणार असून, केवळ आपत्कालीन सेवा सुरू राहणार आहेत.

बीएमसी-मार्डने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, ५ ऑगस्ट रोजी आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात नियमित बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सेवा बंद ठेवण्यात आल्या. मात्र, महाराष्ट्र शासन किंवा संबंधित यंत्रणांकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मार्डने स्पष्ट केले की, “हा संघर्ष कोणत्याही मान्यताप्राप्त वैद्यकीय पद्धतीविरोधात नसून ‘क्रॉसपॅथी’ला विरोध करण्यासाठी आहे. सीसीएमपी पात्रता असलेल्या बीएचएमएस डॉक्टरांच्या एमएमसी नोंदणीमुळे रुग्णांच्या सुरक्षिततेवर, आधुनिक वैद्यकीय शिक्षणाच्या गुणवत्तेवर आणि व्यावसायिक मानकांवर गंभीर परिणाम होऊ शकतो, अशी भूमिका संघटनेने मांडली आहे.”

मार्डच्या मागण्या

  • बीएचएमएस डॉक्टरांची एमएमसी नोंदणी प्रक्रिया तत्काळ स्थगित करणे

  • निवासी डॉक्टरांच्या प्रलंबित प्रश्नांवर शासन व महापालिका प्रशासनाने तातडीने चर्चा करणे

  • आधुनिक वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता, व्यावसायिक प्रामाणिकता

  • रुग्ण सुरक्षा अबाधित राखण्यासाठी आवश्यक पावले उचलणे

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : कोस्टल रोडवर भरधाव BMW पुलावरून कोसळली; तिघांचा जागीच मृत्यू, अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

UPI व्यवहारांवरील शुल्क हा नागरिकांसाठी 'डिजिटल सापळा'; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्ला

भारताचा GDP ३८ लाख कोटी डॉलरवर पोहोचेल; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा विश्वास

Mumbai : पूरमुक्तीसाठी महापालिकेचा ॲक्शन प्लॅन; १३ हजार कोटींचा खर्च अपेक्षित

Mumbai : शस्त्रक्रियेदरम्यान मज्जातंतूंचे नुकसान टाळण्यास मदत; पालिका रुग्णालयांत 'इंट्रा ऑपरेटिव्ह नर्व्ह मॉनिटरिंग' प्रणाली