मुंबई

शंभरहून सहाय्यक अभियंते पदोन्नतीच्या प्रतीक्षेत; पालिका प्रशासनाविरोधात नाराजी

मुंबई महापालिकेच्या विविध विभागात कार्यरत सहाय्यक अभियंता पदोन्नतीसाठी पात्र असताना बढतीच्या प्रतीक्षेत आहेत.

Swapnil S

मुंबई : मुंबई महापालिकेच्या विविध विभागात कार्यरत सहाय्यक अभियंता पदोन्नतीसाठी पात्र असताना बढतीच्या प्रतीक्षेत आहेत. पालिका प्रशासन या गंभीर प्रश्नी निर्णय घेत नसल्याने शंभरहून अधिक सहाय्यक अभियंत्यांनी पालिका प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबई महापालिकेतील सहाय्यक अभियंता ठरावीक सेवा कालावधीनंतर कार्यकारी अभियंतापदासाठी पात्र ठरतात. परंतु सहाय्यक अभियंतापदाचा बढतीसाठी आवश्यक कालावधी पूर्ण केल्यानंतरही तब्बल शंभरहून अधिक अभियंते हे प्रतीक्षेत आहेत. पालिका प्रशासनाकडून वारंवार पाठपुरावा करूनही दुर्लक्ष केले जात असल्याची नाराजी अभियंत्यांनी व्यक्त केली आहे.

तसेच अभियंत्यांचा कारभार सांभाळणाऱ्या नगर अभियंता विभागाचा कार्यभार अद्याप समजून घेतलेला नाही. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त सैनी यांच्याकडून याबाबत कोणतीही बैठक आणि त्याबाबत निर्णय घेतला जात नसल्याने अभियंत्यांमध्ये नाराजी वाढत आहे. त्यामुळे सहाय्यक अभियंते हे पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असून, प्रशासन याबाबत कधी निर्णय घेणार? असा सवाल अभियंत्यांकडून उपस्थित केला जात आहे.

Maharashtra Rain : अतिवृष्टीग्रस्त २३ जिल्ह्यांसाठी महाराष्ट्र सरकारकडून मदत जाहीर; ३,२५८ कोटींची मंजूरी

मतदार यादीत गोंधळ! संभाजीनगरात ३६,००० डुप्लिकेट नावे; निवडणुका पुढे ढकला, विरोधी पक्षानंतर महायुतीच्या आमदाराची मागणी

Nandurbar : ऐन दिवाळीत भाविकांवर काळाचा घाला; चांदशैली घाटात भीषण अपघात, अस्तंबा यात्रेवरून परतणाऱ्या ६ जणांचा मृत्यू

Pakistan-Afghanistan War : ३ खेळाडूंच्या मृत्यूनंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय; पाकिस्तानला मोठा फटका बसणार?

Pakistan-Afghanistan War : युद्धविरामानंतरही पाकिस्तानकडून हवाई हल्ला; अफगाणिस्तानच्या ३ खेळाडूंचा मृत्यू