Mumbai : हॉटेल ट्रायडेंटला BMC चा दणका; अनधिकृत बांधकाम हटवण्याचे दिले आदेश 
मुंबई

Mumbai : हॉटेल ट्रायडेंटला BMC चा दणका; अनधिकृत बांधकाम हटवण्याचे दिले आदेश

मुंबई महापालिकेने नरिमन पॉइंट येथील ट्रायडेंट हॉटेलमध्ये उभारण्यात आलेल्या कथित अनधिकृत तात्पुरत्या संरचनेला तात्काळ हटवण्याचे आदेश दिले आहेत. ही कारवाई संरचनेला नियमित करण्याच्या प्रस्तावाला नकार दिल्यानंतर करण्यात आली आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबई महापालिकेने नरिमन पॉइंट येथील ट्रायडेंट हॉटेलमध्ये उभारण्यात आलेल्या कथित अनधिकृत तात्पुरत्या संरचनेला तात्काळ हटवण्याचे आदेश दिले आहेत. ही कारवाई संरचनेला नियमित करण्याच्या प्रस्तावाला नकार दिल्यानंतर करण्यात आली आहे.

१८ मार्चला जारी करण्यात आलेल्या स्पीकिंग ऑर्डरमध्ये पालिकेच्या 'ए' विभाग कार्यालयाने नमूद केले की, 'हँगर'प्रमाणे दिसणारी ही रचना आवश्यक परवानगीशिवाय उभारण्यात आली. अॅल्युमिनियम चॅनल व पॅनल शीटपासून तयार केलेल्या या संरचनेचे माप अंदाजे २६ मीटर x १ मीटर X ३.५ मीटर इतके आहे. यापूर्वी ११ मार्चला पालिका अधिनियमांतर्गत काम थांबवण्याची नोटीस बजावण्यात आली.

सुनावणीदरम्यान हॉटेल प्रतिनिधींनी सांगितले की, या संरचनेला नियमित करण्यासाठी ऑनलाइन प्रस्ताव सादर केला होता. मात्र, तपासणीदरम्यान, हा प्रस्ताव फेटाळण्यात आला होता.

... म्हणून ठरवले बांधकाम अनधिकृत

नोटिशीत नमूद करण्यात आले आहे की, संबंधित पक्षाला पुरेसा वेळ आणि सुनावणीची संधी देण्यात आली होती, तरीही त्यांनी सक्षम प्राधिकरणाची परवानगी सादर केलेली नाही किंवा संरचना हटवलेली नाही. त्यामुळे हे बांधकाम अनधिकृत ठरवले.

मुंबईत नवी सुरुवात करण्याचे स्वप्न भंगले! घाटकोपर दरडीत शेख कुटुंबाचा करुण मृत्यू, चार दिवसांपूर्वीच मुंबईत आलेले कुटुंब उद्ध्वस्त

अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ नाही; राज्य सरकारचा व्यावसायिक चालकांना इशारा

माथेरानमध्ये मोबाईल नेटवर्कचा बोजवारा; डिजिटल व्यवहार ठप्प; दैनंदिन व्यवहारांवर परिणाम

निकाल आधीच ठरवला, त्यानुसार शिंदेंना लाभ दिला; निवडणूक आयोगावर सिब्बल यांचा आरोप

'डॉमिनोज'च्या ४ दुकानांचे परवाने निलंबित; मुंबईतील तीन तर कराडमधील एका शाखेचा समावेश