मुंबई

Mumbai : कूपर रुग्णालयाचे डीन 'हाजीर हो'! गैरवर्तनावर स्थायी समितीत नाराजी

मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीने कूपर रुग्णालयाच्या डीन डॉ. छाया शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत रुग्णालयाशी संबंधित एक प्रस्ताव मंजूर करण्यास नकार दिला. डीन यांनी स्थायी समितीसमोर हजर होऊन खुलासा करेपर्यंत कूपर रुग्णालयाचे कोणतेही प्रस्ताव मंजूर केले जाणार नाहीत, असा इशारा स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी दिला.

Swapnil S

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीने कूपर रुग्णालयाच्या डीन डॉ. छाया शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत रुग्णालयाशी संबंधित एक प्रस्ताव मंजूर करण्यास नकार दिला. डीन यांनी स्थायी समितीसमोर हजर होऊन खुलासा करेपर्यंत कूपर रुग्णालयाचे कोणतेही प्रस्ताव मंजूर केले जाणार नाहीत, असा इशारा स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी दिला.

स्थायी समितीच्या बैठकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नगरसेवक यशोधर फणसे यांनी कूपर रुग्णालयातील कारभारावर गंभीर आरोप केले. त्यांनी सांगितले की, रुग्णालयाच्या डीन नगरसेवकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करतात. न्यूरो विभागातील एका रुग्णाची शस्त्रक्रिया रुग्णालयात वायफाय आणि इंटरनेट सुविधा नसल्याच्या कारणावरून पुढे ढकलण्यात आली. तीन दिवसांनी शस्त्रक्रियेची तारीख देऊनही ती होऊ शकली नाही.”

कूपरमधील अर्भक मृतप्रकरणी पोलिसांत तक्रार

डॉ. रुस्तम नरसी कूपर रुग्णालयात १३ जुलै रोजी सकाळी तळ मजल्यावरील महिला अपघात विभागातील स्वच्छतागृहात एका महिलेला बेवारस अर्भक निदर्शनास आले. संबंधित महिलेने याबाबतची माहिती कर्तव्यावरील कर्मचाऱ्याला दिली. रुग्णालयाच्या कार्यपद्धतीनुसार बेवारस स्थितीत आढळलेल्या अर्भकाची वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तत्काळ तपासणी करण्यात आली. तपासणीअंती अर्भकाला मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृत अर्भक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेबाबत रुग्णालय प्रशासनाकडून लेखी तक्रार जुहू पोलिस ठाणे येथे नोंदविण्यात आली आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai Local Mega Block : उद्या मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; अनेक लोकल रद्द, एक्स्प्रेस गाड्यांनाही फटका

मुंबईत उष्माघाताचा धोका; दुपारी ११ ते २ प्रकल्प कामे बंद ठेवा, नगरसेविकेचे महापालिका आयुक्तांना पत्र

'देव त्यांचं भलं करो'; तनुश्री दत्ताच्या आरोपांवर नाना पाटेकरांचा मुलगा मल्हारने सोडलं मौन

Mumbai : अजय देवगणच्या जुहूतील बंगल्यावर BMC चा हातोडा! अनधिकृत बांधकामावर कारवाई; नेमकं प्रकरण काय?

Delhi Protest : अभिजीत दिपकेंना आज न्यायालयात हजर करणार; AISA च्या नेहा बोरा यांची सुटका