Mumbai : छठपूजेसाठी एक खिडकी योजना; मनपा आयुक्त अश्विनी भिडे यांचे निर्देश 
मुंबई

Mumbai : छठपूजेसाठी एक खिडकी योजना; मनपा आयुक्त अश्विनी भिडे यांचे निर्देश

मुंबईत छठपूजेच्या उत्सवासाठी मुंबई महानगरपालिकेने विशेष नियोजन करावे. यासाठी छठपूजेदरम्यान भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी गुरुवारी महापालिका आयुक्त कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.

Swapnil S

मुंबई : मुंबईत छठपूजेच्या उत्सवासाठी मुंबई महानगरपालिकेने विशेष नियोजन करावे. यासाठी छठपूजेदरम्यान भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी गुरुवारी महापालिका आयुक्त कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला २० हून अधिक छठपूजा समित्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांनी विविध सूचना आणि मागण्या मांडल्या. त्यानुसार आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले.

छठपूजा हा श्रद्धेचा आणि सांस्कृतिक परंपरेचा महत्त्वाचा उत्सव आहे. मुंबई महानगरपालिकेने छठपूजा स्थळांवर कृत्रिम तलाव, स्वच्छता, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आदी सुविधा द्याव्यात. तसेच, एक खिडकी योजनेद्वारे परवानग्यांची प्रक्रिया सुलभ करून भाविकांची गैरसोय टाळावी.

मुंबईची सर्वसमावेशक संस्कृती जपत छठपूजा उत्सव सुरक्षित आणि उत्साहात नक्कीच पार पडेल, असा विश्वास कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला.

मुंबईतील मढ-मार्वे, जुहू चौपाटी, गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी आणि बाणगंगा येथे छठपूजेसाठी मोठ्या संख्येने भाविक एकत्र येतात. जुहू चौपाटीवर सुमारे पाच लाख भाविक छठपूजेसाठी उपस्थित राहत असल्याने तेथे पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी बैठकीत करण्यात आली. सार्वजनिक स्वच्छतागृहे, कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र खोल्या, पिण्याचे पाणी तसेच इतर मूलभूत सुविधांची व्यवस्था करण्यावर समित्यांच्या प्रतिनिधींनी भर दिला.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

पर्यटकांसाठी आनंदाची बातमी; नेरळ-माथेरान 'मिनी ट्रेन' आजपासून पुन्हा धावणार, बघा वेळापत्रक

वनसंपदेसाठी न्यायालयात दाद मागू; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा

मतवारी दुष्काळाची! पर्यावरण मतपेटीत कधी उतरणार? दुष्काळमुक्तीसाठी राजकीय इच्छाशक्ती आणि मतदारांच्या जागरूकतेची गरज

कचरा टाकणाऱ्यांना ‘एआय’ कॅमेऱ्याची तंबी; मुंबई मनपाचा उपक्रम, कचरा इतरत्र टाकताच स्वच्छतेचा संदेश मिळणार

मुंबईसह आठ शहरांत रेल्वेची डोअरस्टेप पार्सल सेवा; खासगी लॉजिस्टिक्स कंपन्यांच्या मदतीने घरपोच पार्सलची सुविधा