मुंबई

BMC चा मास्टर प्लॅन : भूमिगत मल्टी-मॉडेल 'टनेल'ने शहर-उपनगर जोडणार; अतिवृष्टीतही सुसाट प्रवास होणार

Swapnil S

मुंबई : मुंबईत अतिवृष्टी झाली, तरी मुंबई थांबणार नाही, असा प्लॅन मुंबई महापालिका तयार करत आहे. मुंबई शहर व दोन्ही उपनगरांना जोडण्यासाठी मल्टी मॉडेल टनेलची निर्मिती करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. मल्टी मॉडेल टनेलमुळे रस्ते वाहतूक सुरू ठेवणे, लाईट, फोन अत्यावश्यक गरजेच्या वस्तू सुरू ठेवणे शक्य होणार आहे. मुंबईची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता टप्याटप्याने टनेलची निर्मिती करण्यात येणार आहे. मल्टी मॉडेल टनेलमध्ये केबल टाकण्यात येणार आहे, जेणे करून मुंबई जलमय झाली, तर अत्यावश्यक सेवा सुरूच राहील. तसेच टनेलमधून रस्ते वाहतूक सुरूच राहील, असे पालिकेच्या पूल विभागाकडून सांगण्यात आले.

२६ जुलै २००५ मध्ये मुंबईत महापूर आला आणि मुंबई ठप्प झाली होती. शेकडो मुंबईकरांचा जीव गेला. रस्ते वाहतूक कोलमडली होती, बत्ती गुल झाल्याने अनेक दिवस मुंबई अंधारात होती. आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला होता. संपूर्ण मुंबईला ब्रेक लागला होता. भविष्यात मुंबईत ढग फुटी झाल्यास मुंबई थांबू नये यासाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून विविध प्रकल्प राबवण्यात येत आहेत. जीर्ण झालेल्या पर्जन्य जलवाहिनी बदलणे, मॅनहोलवर संरक्षक जाळ्यांनी बंदिस्त करणे अशा उपाययोजना करण्यात येत आहेत. तरीही अतिवृष्टी झाली, तर मुंबईला ब्रेक लागू नये यासाठी मुंबई शहर व दोन्ही उपनगराला जोडण्यासाठी मल्टी मॉडेल टनेल उभारण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

सल्लागाराची नियुक्ती

मल्टी मॉडेल टनेल मध्ये टेलिफोन, विद्युत केबल, पर्जन्य जलवाहिनी, पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. मुंबईत धुवांधार पाऊस झाला, तरी केबलला काही फटका बसणार नाही आणि लाईट, फोन सगळं सुरळीत सुरू राहणार आहे. तसेच भर पावसात रस्ते वाहतुकीचा खेळ खंडोबा होऊ नये यासाठी मल्टी मॉडेल टनेलमधून रस्ते वाहतूक सुरू ठेवणे शक्य होणार आहे. यासाठी प्रकल्प अहवाल तयार करणे, मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार आहे.

‘असा’ होणार उपयोग

-१५ वर्षांचा मास्टर प्लॅन

- रस्ते वाहतूक

- उच्च दाबाच्या केबल

- टेलिफोनच्या केबल

- पाण्याच्या पाईपलाईन

- पर्जन्य जलवाहिनी

- लाईट्स केबल

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस