मुंबई

BMC चे पार्किंग प्रकल्प रखडले; शहरात पार्किंगचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

वाढत्या शहरीकरणासह वाहनाच्या संख्येत वाढ झाली आहे. परिणामी, वाहन पार्किंगची समस्या निर्माण झाली आहे.

Swapnil S

मुंबई : वाढत्या शहरीकरणासह वाहनाच्या संख्येत वाढ झाली आहे. परिणामी, वाहन पार्किंगची समस्या निर्माण झाली आहे. या समस्येवर तोडगा म्हणून पालिकेने योजलेले प्रस्तावित प्रकल्पही रखडले आहे. यामुळे पार्किंगचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

पालिकेचे गेल्या सहा महिन्यांपासून दोन रोबोटिक पार्किंग प्रकल्प संकल्पना आणि बांधकामाच्या टप्प्यात रखडले आहेत, तर कंत्राटदाराचा करार रद्द झाल्यानंतर एक ऑपरेशनल लॉट रिक्त राहिला आहे. २०२३ मध्ये पालिकेने मुंबादेवीमध्ये १२२ कोटी रुपयांचा १७ मजली पार्किंग लॉट प्रकल्प तर माटुंगा येथे १२७ कोटी रुपयांचा २६ मजली सुविधा प्रकल्प सुरू केला होता. मात्र, स्थानिक व राजकीय दबावापोटी गेल्या वर्षी मुंबादेवी प्रकल्पासाठी पालिकेने काम थांबवण्याची नोटीस बजावली होती. तर माटुंगा प्रकल्पाच्या निविदा जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात रद्द करण्यात आल्या होत्या.

मुंबादेवी येथील आणखी एक बांधकाम सुरू असलेली पार्किंगची सुविधा राज्य सरकारने कंत्राटदाराला काम थांबवण्याची नोटीस बजावण्याचे निर्देश दिल्यानंतर गेल्या वर्षी बंद करण्यात आली होती. या सुविधेत एकावेळी ६०० वाहने उभी करण्याची सुविधा होती.

तत्पुर्वी नोव्हेंबर २०२४ मध्ये दक्षिण मुंबईतील भुलाभाई देसाई रस्त्यावरील आणखी एक रोबोटिक पार्किंग सुविधा पालिकेने पार्किंगची देखभाल करण्यासाठी जबाबदार असलेल्या कंत्राटदारासोबतचा करार रद्द केल्याने काम थांबवावे लागले होते. ही २१ मजली सुविधा २०२१मध्ये कार्यान्वित झाली होती. ती मुंबईची पहिली रोबोटिक पार्किंग सुविधा होती. यामध्ये एकावेळी २४० वाहने बसू शकत होती.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद होणार नाही; देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

वेतन श्रेणीच्या प्रशिक्षणासाठी अनुपस्थित शिक्षकांना दिलासा; ३ नोव्हेंबरपर्यंत प्रशिक्षण घेता येणार

एसटी प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेत मोठे पाऊल; सहा आठवड्यांत चौकशी पूर्ण करत अहवाल सादर करणे बंधनकारक

जळगाववरून आता दररोज विमानसेवा सुरू; जळगाव-मुंबई आणि जळगाव-अहमदाबाद प्रवासी सेवा

कल्याणमध्ये उद्या पाणीपुरवठा ठप्प