X - @mybmc - स्क्रीनशॉट
मुंबई

Ambedkar Jayanti : BMC ची जय्यत तयारी; अनुयायांसाठी शहरात आज सोयीसुविधा, बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित प्रदर्शन

मुंबई : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित छायाचित्र प्रदर्शन, चैत्यभूमी येथून यूट्यूब, फेसबुक, एक्स व समाज माध्यमांवर थेट प्रक्षेपण, बाबासाहेबांच्या अनुयायांसाठी दादर येथील चैत्यभूमीवर सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त पालिकेने जय्यत तयारी केली आहे.

Swapnil S

मुंबई : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित छायाचित्र प्रदर्शन, चैत्यभूमी येथून यूट्यूब, फेसबुक, एक्स व समाज माध्यमांवर थेट प्रक्षेपण, बाबासाहेबांच्या अनुयायांसाठी दादर येथील चैत्यभूमीवर सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त पालिकेने जय्यत तयारी केली आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दादरस्थित चैत्यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास अभिवादन करण्यासाठी अनुयायी येतात. या पार्श्वभूमीवर, विविध प्रकारच्या नागरी सोयीसुविधा पुरवण्याच्या उद्देशाने महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले आहे. उपायुक्त (परिमंडळ २) प्रशांत सपकाळे, जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त विनायक विसपुते यांच्या देखरेखीखाली विविध स्तरीय कार्यवाही करण्यात आली आहे.

चैत्यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक तसेच परिसरामध्ये नियंत्रण कक्ष, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे, शौचालये आदी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यासोबतच सीसीटीव्ही, चैत्यभूमीजवळ समुद्रात जीवरक्षक बोटी, अग्निशमन दलाचे पथक तैनात करण्यासह अग्निशमन सुविधा सुसज्ज ठेवण्यात आल्या आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत नागरिकांना वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येणार आहेत. त्याकरिता बृहन्मुंबई पालिकेतील डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी पुरेशा संख्येने नेमण्यात आलेले आहेत. आणीबाणीच्या प्रसंगी तात्काळ मदतीसाठी रुग्णवाहिका तैनात करण्यात आली आहे.

दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शन

१४ एप्रिल २०२५ रोजी चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन बृहन्मुंबई पालिकेच्या जनसंपर्क विभागाद्वारे करण्यात आले आहे. या प्रदर्शन दालनात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासातील दुर्मिळ छायाचित्रे असणार आहेत. त्याचबरोबर या प्रदर्शन दालनात, संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरक जीवन चरित्रावर आधारित कॉफी टेबल बुक विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.

आज अभिवादन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी स्मारक येथे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्रीगण यांसह अन्य सोमवार, १४ एप्रिल रोजी सकाळी ९.३० वाजता पुष्प अर्पण करून अभिवादन करतील.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video