Freepik
मुंबई

बीएनवायएस अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांची पाठ; संस्थास्तरावरील प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत राबविण्यात येत असलेल्या बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी ॲण्ड योगिक सायन्स (बीएनवायएस) या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया विलंबाने सुरू झाली आहे. फेब्रुवारी २०२५ मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आल्याने नियमित फेऱ्यांमध्ये ३० ते ४० टक्के जागांवरच प्रवेश झाल्याने हा अभ्यासक्रम कसा राबवायचा, असा प्रश्न महाविद्यालयांसमोर निर्माण झाला आहे.

Swapnil S

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत राबविण्यात येत असलेल्या बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी ॲण्ड योगिक सायन्स (बीएनवायएस) या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया विलंबाने सुरू झाली आहे. फेब्रुवारी २०२५ मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आल्याने नियमित फेऱ्यांमध्ये ३० ते ४० टक्के जागांवरच प्रवेश झाल्याने हा अभ्यासक्रम कसा राबवायचा, असा प्रश्न महाविद्यालयांसमोर निर्माण झाला आहे. या अभ्यासक्रमाच्या संस्थास्तरावरील प्रवेश प्रक्रियेला २८ व २९ मेपासून सुरुवात होणार आहे.

वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी ॲण्ड योग सायन्स हा अभ्यासक्रम नव्याने सुरू करण्यात आला. बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्स या अभ्यासक्रमामध्ये निसर्गोपचार आणि योग यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. हा अभ्यासक्रम नैसर्गिक उपचार पद्धती, योग आणि आधुनिक विज्ञानाचा समन्वय साधणारा असून, या अभ्यासक्रमात साडेचार वर्षांचा अभ्यास आणि एक वर्षाची इंटर्नशिप आहे. राज्यातील तीन महाविद्यालयांमध्ये हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. यामध्ये एक सरकारी महाविद्यालय असून, दोन खासगी महाविद्यालय आहे. त्यानुसार राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरूवात केली.

मात्र नियमित फेऱ्यानंतरही या अभ्यासक्रमांला प्रवेश घेण्याकडे फार कमी विद्यार्थ्यांनी लक्ष दिले. नियमित फेऱ्यांमध्ये ३० ते ४० जागांवरच प्रवेश झाले आहेत. त्यामुळे विलंबाने प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याचा फटका या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला बसला आहे. नियमित फेऱ्यानंतर आता संस्थास्तरावरील प्रवेश फेरी २८ मेपासून सुरू करण्यात येत आहे. या फेरीचे वेळापत्रक राज्य सामाईक प्रवेश प्रक्रियेकडून जाहीर करण्यात आले आहे. मात्र या फेरीमध्येही विद्यार्थी उपलब्ध होतील का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक

  • ऑनलाईन नोंदणी - २८, २९ मे

  • नोंदणी शुल्क भरणे - २८, २९ मे

  • संकेतस्थळावर कागदपत्रे अपलोड करणे - २८, २९ मे

  • रिक्त जागांचा तपशील जाहीर करणे - २९ मे

  • पात्र उमेदवारांची यादी जाहीर करणे - ३० मे

  • पात्र इच्छुक उमेदवाराने संबंधित महाविद्यालयात अर्ज करणे - ३१ मे ते ३ जून

  • गुणवत्ता यादी जाहीर - ३ जून (सायंकाळी ६ वाजता)

  • प्रत्यक्ष महाविद्यालयात प्रवेश घेणे - ४ ते ७ जून

  • रिक्त जागा आणि प्रतीक्षा यादी जाहीर - ७ जून (सायंकाळी ६ वाजता)

  • प्रतीक्षा यादीतून गुणवत्तेच्या आधारे रिक्त जागा भरणे - ८ जून

Maratha Reservation : मराठा वादळाने मुंबईला हादरा; आता माघार नाही – मनोज जरांगेंचा निर्धार; पावसामुळे आंदोलकांचे प्रचंड हाल

मुंबईला पावसाने झोडपले; पुढील तीन दिवस मध्यम पावसाची शक्यता

महायुतीच्या घोडचुकीमुळे मुंबईकर वेठीस; मराठा आंदोलनामुळे मुंबईत गोंधळाची स्थिती

आंदोलनामुळे हॉटेल, दुकाने बंद; आंदोलकांची झाली गैरसोय, सोबत १५ दिवसांची शिदोरी...

CSMT टाळण्याचे प्रवाशांना रेल्वेचे आवाहन; मराठा आरक्षण आंदोलनामुळे दक्षिण मुंबई ठप्प