मुंबई

बॉडी बिल्डर संकल्प भाटकरचा आई-वडिलांवर चाकूने हल्ला ; आईचा मृत्यू , वडील गंभीर जखमी

मोटारसायकलवरून मुंबईच्या दिशेने पळून जात असताना कुर्ला नेहरू नगर येथून संकल्प याला अटक

नवशक्ती Web Desk

ठाण्यातील घोडबंदर रोड येथे बॉडी बिल्डर संकल्प भाटकर याने आई-वडिलांवर चाकूने हल्ला केला. या जीवघेण्या हल्ल्यात आईचा मृत्यू झाला असून वडील गंभीर जखमी झाले आहेत. वडिलांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आई-वडिलांवर हल्ला करून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या संकल्प भाटकरला कासारवडवली पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर खून व खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनिता विलास भाटकर (66), विलास मुकुंद भाटकर (71) या हल्ल्यात विनिता यांचा मृत्यू झाला असून वडिलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संकल्प पूर्व कोपरी, ठाणे येथे राहतो आणि त्याचे आई-वडील त्याच्या मोठ्या भावासह कोरल हाइट्स, घोडबंदर रोड, ठाणे येथे राहत होते. दोन आठवड्यांपूर्वी संकल्पचा आई-वडिलांशी काही कारणावरून वाद झाला होता.

गुरुवारी सकाळी 11 वाजता संकल्प आपल्या भावाच्या घरी गेला आणि तेथे त्याचा पुन्हा आई व वडिलांशी जुना वाद झाला. या वादातून त्याने आणलेल्या चाकूने आई-वडिलांवर वार करून जखमी केले. या हल्ल्यात जखमी झालेल्या विनिता आणि विलास यांना शेजाऱ्यांनी जवळच्या खासगी रुग्णालयात आणले, तेथे डॉक्टरांनी विनिता यांना मृत घोषित केले तर विलास यांना उपचारासाठी अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर पळून गेलेल्या संकल्प भाटकरचा कासारवडवली पोलिसांनी शोध सुरू केला. दरम्यान, मोटारसायकलवरून मुंबईच्या दिशेने पळून जात असताना कुर्ला नेहरू नगर येथून संकल्प याला अटक करण्यात आली. कासारवडवली पोलिसांनी संकल्प याच्याविरुद्ध खून व खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. संकल्प हा बॉडी बिल्डर असून त्याने अनेक बॉडी बिल्डिंग स्पर्धा जिंकल्या आहेत.

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; हवामान खात्याचा इशारा

पूरग्रस्तांना भरीव मदत द्या! मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

Ajit Pawar : पूरग्रस्तांना तातडीने ५ हजार रुपये व १० किलो धान्य

नवी मुंबई विमानतळ, मेट्रोंचे ८-९ ऑक्टोबरला उद्घाटन

नाराजांवर होणार कारवाई! काळे झेंडे दाखविणाऱ्यांवर बडगा; पूरग्रस्त भागात भेट देणाऱ्या नेत्यांबाबत सरकारचा इशारा