दिग्दर्शक रोहित शेट्टींना पुन्हा धमकी  संग्रहित छायाचित्र
मुंबई

दिग्दर्शक रोहित शेट्टींना पुन्हा धमकी

बॉलीवूडचे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांना पुन्हा एकदा ठार मारण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. शनिवारी (दि. २७) सकाळी एका अज्ञात व्यक्तीने फोन करून शेट्टी यांच्याकडे तब्बल २० कोटी रुपयांची खंडणी मागितली. ही खंडणी न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही दिली.

Swapnil S

मुंबई : बॉलीवूडचे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांना पुन्हा एकदा ठार मारण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. शनिवारी (दि. २७) सकाळी एका अज्ञात व्यक्तीने फोन करून शेट्टी यांच्याकडे तब्बल २० कोटी रुपयांची खंडणी मागितली. ही खंडणी न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही दिली.

शनिवारी सकाळी रोहित शेट्टी यांच्या मोबाईलवर हा धमकीचा कॉल आला होता. कॉल करणाऱ्या व्यक्तीने थेट २० कोटी रुपयांची मागणी केली. या धमकीच्या कॉलमुळे चित्रपटसृष्टीत पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शेट्टी यांच्या टीमने तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

या गंभीर प्रकाराची दखल घेत मुंबई गुन्हे शाखेने तातडीने तपासाची चक्रे फिरवली आहेत. धमकीचा कॉल नक्की कोठून आला आणि तो कोणी केला, याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. कॉल करणाऱ्या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसली तरी, पोलीस सर्व तांत्रिक बाबी तपासत आहेत.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

डिसेंबरपर्यंत उन्हाचे चटके बसणार! एल निनोची तीव्रता वाढणार, सरासरीपेक्षा अधिक तापमान राहणार

ज्ञानेश कुमार यांच्यावरील याचिकांवर आज सुनावणी

ज्ञानेशांविरोधात 'गर्जना'; सर्वपक्षीय मोर्च्यात राज्यातील SIR रद्द करण्याची मागणी

नागरिकांचे मत काढून घेणारी प्रक्रिया मनमानी; सर्वोच्च न्यायालयाचे न्या. उज्ज्वल भुयान यांची चपराक

GST अधिकाऱ्यांवर आता लागणार लगाम; जीएसटी अंमलबजावणीत व्यापक सुधारणा होणार