मुंबई उच्च न्यायालय 
मुंबई

प्रदूषण रोखण्यासाठी बांधकाम प्रकल्पांवर कठोर नियंत्रण ठेवा; उच्च न्यायालयाचे सक्त आदेश

दिल्लीपाठोपाठ मुंबईतील प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरात ५०० मीटरच्या पुढे दिसेनासे झाले आहे, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने गुरुवारी चिंता व्यक्त केली होती. त्याचवेळी राज्य सरकार आणि बृहन्मुंबई महापालिकेला भूमिका स्पष्ट करण्यासाठी एक दिवसाचा वेळ दिला होता.

Swapnil S

मुंबई : मुंबईतील वाढत्या प्रदूषणाची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्य सरकार आणि बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाला सक्त आदेश दिले. प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी कठोर नियंत्रण ठेवा, तेथे मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करण्याची खबरदारी घ्या, असे निर्देश न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठाने दिले. तसेच प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजनांसाठी तातडीने पाच सदस्यीय स्वतंत्र समिती स्थापन करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

दिल्लीपाठोपाठ मुंबईतील प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरात ५०० मीटरच्या पुढे दिसेनासे झाले आहे, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने गुरुवारी चिंता व्यक्त केली होती. त्याचवेळी राज्य सरकार आणि बृहन्मुंबई महापालिकेला भूमिका स्पष्ट करण्यासाठी एक दिवसाचा वेळ दिला होता. त्यानुसार शुक्रवारी मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.

यावेळी खंडपीठाने तातडीने प्रदूषण नियंत्रणासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले. मुंबईतील खराब हवेच्या गुणवत्तेवर नियंत्रण मिळविण्यासाठी वेळ लागेल, परंतु मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन केल्यास बांधकामांमुळे होणारे प्रदूषण नियंत्रित केले जाऊ शकते, असे खंडपीठाने स्पष्ट केले. त्याच अनुषंगाने शहर आणि उपनगरांतील बांधकाम स्थळांची तपासणी करण्यासाठी पाच सदस्यांची स्वतंत्र समिती स्थापन केली.

या समितीमध्ये बृहन्मुंबई महापालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे. बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी प्रदूषण नियंत्रण उपायांचे काटेकोर पालन केले जात आहेत की नाही, याची पडताळणी समितीमार्फत केली जाणार आहे.

मुंबईतील खराब हवेच्या प्रश्नाकडे लक्ष वेधणाऱ्या विविध याचिकांवर मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे ही सुनावणी झाली. २०२३ पासून मुंबईच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक सातत्याने खालावत चालला आहे, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी केला. त्याची दखल घेत न्यायालयाने पालिका आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला १५ डिसेंबरपर्यंत प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी मागील वर्षात केलेल्या कृतींचा तपशीलवार अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

  • मुंबईतील वायू प्रदूषण रोखण्यासाठी बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी उपाययोजनांची सक्ती अनिवार्य करा.

  • ‘एक्यूआय’ सुधारेपर्यंत लोकांना रेल्वे स्थानक, गर्दीची ठिकाणे आणि इतर सार्वजनिक ठिकाणी मास्क देण्याबाबत विचार करावा, अशी सूचना न्यायालयाने केली.

  • मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी प्रदूषण दर्शक यंत्रणा, धूळ बाहेर उडू नये यासाठी उंच पत्रे उभारणे केवळ बंधनकारक करून भागणार नाही, तर त्यांची अंमलबजावणी होतेय की नाही?, याची वेळोवेळी तपासणी करणे गरजेचे आहे.

मोठी बातमी! अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांचा राजीनामा

Mumbai Tiranga March : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतरही मोर्चा होणारच! 'हा तरुणाईच्या विजयाचा जल्लोष'; ठाकरे बंधूंची घोषणा

'आता लवकर घरी परत ये...'; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अभिजीत दिपकेंच्या आई-वडिलांनी व्यक्त केल्या भावना, Video

'लोकशाहीने कात टाकली...'; धमेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया

Mumbai : मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक; ठाणे-कल्याण दरम्यान जलद मार्गावर ब्लॉक, ट्रान्स-हार्बर मार्गावरही ब्लॉक