वृद्ध वडिलांना न्यायालयात खेचणाऱ्या मुलाला ५ लाखांचा दंड 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

वृद्ध वडिलांना न्यायालयात खेचणाऱ्या मुलाला ५ लाखांचा दंड

७८ वर्षीय वृद्ध वडिलांना कायदेशीर वादात अडकवण्यासाठी आणि मानसिक छळ करण्यासाठी कायद्याचा गैरवापर करणाऱ्या मुलाला उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला. न्यायालयाने मुलाचे अपील फेटाळतानाच त्याला ५ लाख रुपयांचा दंड ठोठावला.

Swapnil S

मुंबई : ७८ वर्षीय वृद्ध वडिलांना कायदेशीर वादात अडकवण्यासाठी आणि मानसिक छळ करण्यासाठी कायद्याचा गैरवापर करणाऱ्या मुलाला उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला. न्यायालयाने मुलाचे अपील फेटाळतानाच त्याला ५ लाख रुपयांचा दंड ठोठावला. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.

अपीलकर्ता जितेंद्र मेघ यांनी निवृत्त आयएएस अधिकारी असलेल्या वडिलांविरोधात २०१५ मध्ये मालमत्तेच्या वाटणीसाठी खटला दाखल केला होता. वडिलांनी जितेंद्र यांच्याविरुद्ध आधीच घर खाली करण्याचा आदेश मिळवला होता.

या कायदेशीर लढाईत वरचढ ठरण्यासाठी जितेंद्र यांनी मानसिक आरोग्य सेवा कायदा, २०१७ च्या कलम १०५ अंतर्गत एक अर्ज दाखल केला. वडिलांना मधुमेह असून त्यांच्या रक्तातील साखर कमी झाल्यामुळे त्यांना भ्रम आणि विसरभोळेपणा होतो. त्यामुळे ते मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचा दावा केला होता.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Video : मित्रानेच केला गेम! फेसबुक किंग बंटी दीक्षितचा निर्घृण खून; आधी कारने स्कूटरला उडवलं, नंतर...

सातारा जिल्हा बँकेच्या नऊ जागा बिनविरोध; दहा वर्षांच्या संचालकपदाचा दिग्गजांना फटका, निवडणुकीत मोठी माघार

Wardha : पोलिसांसमोरच आरोपीने महिला डॉक्टरला लगावली जोरदार थप्पड; डॉक्टरांकडून कारवाईची मागणी, CCTV व्हिडीओ व्हायरल

Mumbai : भुलेश्वरमध्ये जुन्या भूमिगत केबल्स बदलणार; २०० कोटी रुपये खर्च, बेस्टचा निर्णय

Mumbai : कथित शिकारीप्रकरणी चितेच्या राखेची तपासणी; दोन छर्रे आणि अर्धवट जळालेला मोबाईल जप्त, दोघांना कोठडी