मुंबई

डबाबंद फळांच्या तुकड्यांना ‘ताजी फळे’ म्हणता येणार नाही; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

साखरेच्या पाकात जतन केलेले किंवा दीर्घकाळ टिकण्यासाठी व्हॅक्यूम-सील केलेल्या फळांना 'ताजे फळ' म्हणता येणार नाही. 'ताजे' हा शब्द वापरण्याचा कायद्याचा हेतू जाणूनबुजून होता. तो अर्थहीन ठरवता कामा नये. जर ताजे, कॅन केलेले, संरक्षित आणि गोठलेले अशा सर्व फळ प्रकारांना समाविष्ट करण्याचा कायद्याचा हेतू असता तर...

Swapnil S

मुंबई : मुंबई विक्री कर कायद्यांतर्गत उत्पादन वर्गीकरणाबाबत उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. साखरेच्या पाकात साठवलेले डबाबंद अननसाचे तुकडे, अननसाचे छोटे तुकडे आणि फळांचे कॉकटेल हे कायद्यातील अनुसूचीच्या एंट्री ए-२३ च्या अनुषंगाने 'ताजी फळे' म्हणून मानले जाऊ शकत नाही, असे न्यायमूर्ती एम. एस. सोनक आणि न्यायमूर्ती अद्वैत एम. सेठना यांच्या खंडपीठाने एका प्रकरणात स्पष्ट केले आणि 'ताजे फळ' ग्राह्य धरून करामध्ये सूट देण्यास नकार दिला.

मुंबईतील विक्री कर विभागाच्या आयुक्तांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती एम. एस. सोनक यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सुनावणी घेतली. 'ताज्या फळा'च्या व्याख्येसंदर्भात न्यायाधिकरणाने चुकीचा अर्थ लावला होता, असे निरिक्षण खंडपीठाने नोंदवले. डबाबंद केलेले तसेच संरक्षित अननसाच्या उत्पादनांना विक्री कर कायद्यातील एंट्री ए-२३ साठी 'ताजी फळे' मानले जाऊ शकत नाही.

ताज्या फळांची व्याख्या

'ताजे फळ' म्हणजे नाशवंत उत्पादन, त्यांच्या नैसर्गिक स्थितीत विकले जाणारे असतात. तथापि, साखरेच्या पाकात जतन केलेले किंवा दीर्घकाळ टिकण्यासाठी व्हॅक्यूम-सील केलेल्या फळांना 'ताजे फळ' म्हणता येणार नाही. 'ताजे' हा शब्द वापरण्याचा कायद्याचा हेतू जाणूनबुजून होता. तो अर्थहीन ठरवता कामा नये. जर ताजे, कॅन केलेले, संरक्षित आणि गोठलेले अशा सर्व फळ प्रकारांना समाविष्ट करण्याचा कायद्याचा हेतू असता तर कायदेशीर नोंदीमध्ये फक्त 'फळे' हा शब्द वापरला असता, असे न्यायालयाने नमूद करत या आधीचा न्यायाधिकरणाचा कर सूट देण्यासंदर्भातील निर्णय चुकीचा ठरवला.

आजचे राशिभविष्य, ८ मार्च २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Women's Day 2026 : "चालीनं तितक्या वाटा गं"; तुमच्या आयुष्यातील खास महिलांना द्या शुभेच्छा, शेअर करा Quotes आणि Messages

Women's Day Special : स्मृती मंधानाचा जागतिक सन्मान; बार्बी वर्ल्डमध्ये स्थान मिळवणारी पहिली क्रिकेटपटू

Women's Day 2026 : राज्यात HPV लसीकरण मोहिमेची सुरुवात; एचपीव्ही म्हणजे काय? जाणून घ्या महत्त्व

Sunday Special Recipe : घरीच बनवा मसालेदार स्टफ्ड पापलेट फ्राय; पाहुण्यांसाठी परफेक्ट डिश, वाचा रेसिपी