मुंबई

वृद्धांचा हवाई प्रवास सुकर करण्यासाठी पावले उचला; उच्च न्यायालयाचे निर्देश; उपाययोजनांची यादी मागवली

सविस्तर तपशील २१ एप्रिलपर्यंत सादर करण्याचे नागरी विमान वाहतूक महासंचालनालया (डीजीसीए) निर्देश उच्च न्यायालयाने दिले.

Swapnil S

मुंबई : ज्येष्ठ नागरिकांचा हवाई प्रवास सुलभ करण्यासाठी एक प्रभावी प्रणाली तयार करणे आणि ती प्रणाली योग्यरीत्या अंमलात आणणे आवश्यक आहे, असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले.

न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने हे मत व्यक्त करताना वृद्ध प्रवाशांचा प्रवास सुकर करण्याच्या दृष्टीने कोणत्या उपाययोजना राबवल्या जाणार आहेत, याचा सविस्तर तपशील २१ एप्रिलपर्यंत सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने नागरी विमान वाहतूक महासंचालनालया (डीजीसीए) दिले. याचिकेवर न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. खंडपीठाने या वस्तुस्थितीची गंभीर दखल घेतली आणि डीजीसीएला ज्येष्ठ नागरिकांचा हवाई प्रवास सुलभकरण्याच्या दृष्टीने पावले उचलण्याचे निर्देश दिले. तसेच प्रस्तावित उपाययोजनांचा तपशील २१ एप्रिलपर्यंत सादर करण्याचेही निर्देश दिले आहेत.

प्रकरण काय?

कोलंबोहून सप्टेंबर २०२३ मध्ये आलेल्या ८१ वर्षीय महिलेला मुंबईत उतरल्यानंतर गैरसोयीचा सामना करावा लागला होता. तिने संधिवात असलेल्या मुलीसाठी तिची व्हीलचेअर दिली. विमानतळावर पर्यायी व्हीलचेअरची व्यवस्था नसल्याने ८१ वर्षीय महिलेला त्रास सहन करावा लागला. केबिन क्रूने तिला उंच रॅम्पवरून चालण्यास भाग पाडले. तिच्यासाठी व्हीलचेअरची उपलब्ध करण्याच्या हेतूने कुटुंबियांना धावपळ करावी लागली. याकडे लक्ष वेधत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली.

Maratha Reservation : मराठा वादळाने मुंबईला हादरा; आता माघार नाही – मनोज जरांगेंचा निर्धार; पावसामुळे आंदोलकांचे प्रचंड हाल

मुंबईला पावसाने झोडपले; पुढील तीन दिवस मध्यम पावसाची शक्यता

महायुतीच्या घोडचुकीमुळे मुंबईकर वेठीस; मराठा आंदोलनामुळे मुंबईत गोंधळाची स्थिती

आंदोलनामुळे हॉटेल, दुकाने बंद; आंदोलकांची झाली गैरसोय, सोबत १५ दिवसांची शिदोरी...

CSMT टाळण्याचे प्रवाशांना रेल्वेचे आवाहन; मराठा आरक्षण आंदोलनामुळे दक्षिण मुंबई ठप्प