न्यायासाठी संघर्ष... आणि हतबलता; पक्षकार वय-९०, सुनावणीची पुढची तारीख - २०४६ (संग्रहित छायाचित्र)
मुंबई

Mumbai : एसटी धडकेत मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराच्या कुटुंबियांना न्याय

एसटी बसच्या भीषण रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराच्या कुटुंबियांना दिलासा देत उच्च न्यायालयाने नुकसानभरपाईच्या रक्कमेत ६,८९ लाखांची मोठी वाढ केली. मोटर अपघात दावा न्यायधिकरणाने यापूर्वी दिलेला निर्णय बदलत न्यायमूर्ती अभय अहुजा यांच्या एकलपीठाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.

Swapnil S

मुंबई : एसटी बसच्या भीषण रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराच्या कुटुंबियांना दिलासा देत उच्च न्यायालयाने नुकसानभरपाईच्या रक्कमेत ६,८९ लाखांची मोठी वाढ केली. मोटर अपघात दावा न्यायधिकरणाने यापूर्वी दिलेला निर्णय बदलत न्यायमूर्ती अभय अहुजा यांच्या एकलपीठाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.

२७ ऑगस्ट १९९१ रोजी मृत श्रीधर शेट्टी हे आपल्या दुचाकीवरून ठाण्याकडून ठाणे बेलापूर रोडवरून जात होते. ठाण्याकडून घणसोली-तुर्भेच्या दिशेने अतिवेगाने येणाऱ्या एसटी बसने त्यांच्या दुचाकीला उजव्या बाजूने जोरात धडक दिली. यात गंभीर दुखापत झाल्यामुळे श्रीधर शेट्टी यांचा जागीच मृत्यू झाला होता.

याप्रकरणी ठाणे येथील मोटर अपघात दावा न्यायधिकरणाने एसटी बस चालकाच्या चुकीच्या साक्षीवर विश्वास ठेवत मृत दुचाकीस्वार अपघातासाठी जबाबदार असल्याचा निष्कर्ष काढला होता. या निर्णयाविरोधात मृत दुचाकीस्वाराची पत्नी आणि दोन मुलांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. त्यावर न्या. अभय अहुजा यांनी निकाल दिला. न्यायालयाने बसमधील प्रवाशाची साक्ष, शवविच्छेदन अहवाल आणि घटनास्थळाचा पंचनामा तपासून न्यायाधिकरणाचा निर्णय चुकीचा ठरवला.

एसटी बस चालकाने बचावासाठी रचलेली जनावरांच्या कळपाची आणि समोरून येणाऱ्या वाहनाची कहाणी खोटी असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. हा अपघात केवळ एसटी बस चालकाच्या निष्काळजीपणामुळेच झाला असून दुचाकीस्वाराची यात काहीही चूक नव्हती, असेही न्यायालयाने नमूद केले.

Traffic Challan : ई-चलन भरलं नाही तर वीज बिलात जोडणार दंडाची रक्कम? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा इशारा

२ हजारांवरील UPI पेमेंट शुल्काला स्थगिती देण्यास SC चा नकार; केंद्रासह RBI लाही नोटीस

मोठी बातमी! CJP च्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी नाकारली परवानगी; अभिजीत दिपकेंकडून २ ऑक्टोबरला 'जेल भरो'ची घोषणा

आई धावत मागे आली, पण क्षणात होत्याचं नव्हतं! स्कॉर्पिओने ३ वर्षांच्या चिमुकल्याला चिरडलं; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO

UMANG App : पीएफच्या कामासाठी आता EPFO ऑफिसच्या फेऱ्या नको! घरबसल्या करता येतील ही १० महत्त्वाची कामं