Mumbai : मुलीच्या मृत्यूनंतर वडिलांना दिलासा उच्च न्यायालयाचे संग्रहित छायाचित्र
मुंबई

Mumbai : मुलीच्या मृत्यूनंतर वडिलांना दिलासा

अपघातात गंभीर जखमी होऊन सोळा वर्षे कोमात राहिलेल्या तृप्ती काव्याचा मृत्यूनंतर मुंबई उच्च न्यायालयाने तिच्या वडिलांना मोठा दिलासा दिला.

Swapnil S

मुंबई : अपघातात गंभीर जखमी होऊन सोळा वर्षे कोमात राहिलेल्या तृप्ती काव्याचा मृत्यूनंतर मुंबई उच्च न्यायालयाने तिच्या वडिलांना मोठा दिलासा दिला.

न्या. जितेंद्र जैन यांच्या एकलपीठाने सोळा वर्षे कोमात असलेल्या आपल्या मुलीला तरुण मुलीला गमावणाऱ्या पालकांच्या वेदनांची भरपाई ही पैशात मोजताच येणार नाही. न्यायाधीकरणाचा सात लाख रुपये देण्याचा सात लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचा निर्णय रद्द करून ३७ लाख रुपये देण्याचे आदेश विमा कंपनीला दिले.

मुंबईत कारच्या धडकेत तृप्ती कावळेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले मात्र त्यानंतर तब्बल सोळा वर्षे कोमात राहून अखेर पाच फेब्रुवारी २०१९ रोजी तिचा मृत्यू झाला. तिच्या आईचे निधन २०१६ मध्ये झाले होते.

मुलीचा मृत्यूनंतर तिच्यावर केलेल्या वैद्यकीय उपचाराचा खर्च मिळावा म्हणून वडिलांनी याचिका केली होती. या याचिकेवर न्या. जैन यांच्या पीठासमोर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने आदेश देताना न्यायाधिकरणाच्या त्रुटींवर बोट ठेवले. कोमात असलेल्या रुग्णांसाठी होणाऱ्या खर्चाकडे न्यायाधिकरणाने दुर्लक्ष केले आहे, स्पष्ट करत मुलीच्या निधनामुळे वडिलांवर कोसळलेला हा आघात पाहता त्यांना ३७ लाखांची भरपाई देण्याचे आदेश विमा कंपनीला दिले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : मध्य रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक; मुख्य आणि हार्बर मार्गावर ब्लॉक

Jantar Mantar Assault Case : स्वतंत्र भारद्वाज अटकेत; न्यायालयाकडून एक दिवसाची पोलीस कोठडी

Mumbai Dahi Handi 2026 : मालाडमध्ये विटांचा खांब कोसळला; ७ वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू

Mumbai Dahi Handi 2026 : दहीहंडीच्या उत्साहाला अपघातांचं गालबोट; २२ गोविंदा जखमी

नळदुर्ग किल्ल्यावरून महिला कुस्तीपटूची तीन मुलांसह उडी; सासरच्या जाचाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल, चौघांवर गुन्हा दाखल