अनुकंपा नियुक्ती हा नोकरी अधिकार नाही; उच्च न्यायालयाचा निर्वाळा  (संग्रहित छायाचित्र)
मुंबई

Mumbai : अनुकंपा नियुक्ती हा नोकरी अधिकार नाही; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

अनुकंपा नियुक्ती हा नोकरी मिळवण्याचा कोणताही हक्काचा अधिकार नाही. अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीसाठी मृत्यूच्या वेळचेच धोरण लागू होतील.

Swapnil S

मुंबई : अनुकंपा नियुक्ती हा नोकरी मिळवण्याचा कोणताही हक्काचा अधिकार नाही. अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीसाठी मृत्यूच्या वेळचेच धोरण लागू होतील. नंतरचे नियम लागू करता येणार नाहीत, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला. न्या. सुमन श्याम आणि न्या. गौतम अंखड खंडपीठाने हा निकाल दिला.

दौंड येथील रहिवासी ऋषिकेश चव्हाण यांनी याचिका दाखल केली होती. त्यांचे वडील बालभारती (पुणे) येथे ‘सीनिअर असिस्टंट स्टोअर कीपर’ म्हणून कार्यरत होते आणि २८ ऑगस्ट २०१९ रोजी सेवेत असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर तत्कालीन २०१७च्या धोरणानुसार अनुकंपा नियुक्ती फक्त गट ‘क’ आणि गट ‘ड’मधील कर्मचाऱ्यांच्या वारसांनाच लागू होती. त्यामुळे त्यांच्या मोठ्या भावाचा अर्ज फेटाळण्यात आला होता. २७ सप्टेंबर २०२१ रोजी राज्य सरकारने नवीन जीआर काढून १ जानेवारी २०२० पासून गट ‘अ’, गट ‘ब’मधील कर्मचाऱ्यांच्या वारसांनाही हा लाभ लागू केला होता.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Pune : बनावट औषधप्रकरणी इंडुकेअरचे परवाने रद्द; उत्पादन, पॅकिंग, तपासणी व वितरण तातडीने बंद करा, FDA चे आदेश

पेपरफुटीला कठोर शिक्षा; १० वर्षे कैद, १० कोटी दंड; सुधारणांऐवजी शिक्षेवर भर; व्ही. राधा समितीचा दुसरा अहवाल सरकारला सादर

भाजप-अकाली दलाची पुन्हा युती; पंजाबात सत्ता आल्यास अकाली दलाचा मुख्यमंत्री: अमित शहा

शतकमहोत्सवी संमेलनाध्यक्षपदी डॉ. शरणकुमार लिंबाळे; अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत एकमताने निर्णय

SIR विरोधात देशव्यापी आंदोलन; २६ नोव्हेंबरपासून सुरू होणार दुसरी फेरी