मुंबई

बॉम्बे आयआयटीत मुलींच्या हॉस्टेलमध्ये डोकावणाऱ्यास अटक

देशभरातून शिक्षणासाठी विद्यार्थी येत असून या विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था तेथीलच वसतिगृहात केली जाते.

प्रतिनिधी

बॉम्बे आयआयटीतील मुलींच्या हॉस्टेलमध्ये डोकावून पाहणाऱ्या एका आरोपीस पवई पोलिसांनी अटक केली. पिंटू गारिया असे या आरोपीचे नाव असून तो आयआयटीच्या कॅण्टीनचा कर्मचारी असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले. पवईतील बॉम्बे आयआयटीमध्ये देशभरातून शिक्षणासाठी विद्यार्थी येत असून या विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था तेथीलच वसतिगृहात केली जाते. रविवारी सायंकाळी काही मुली हॉस्टेलमध्ये बसल्या होत्या. यावेळी तिथे कोणीतरी त्यांना डोकावून पाहत असल्याचे काही मुलींच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी सुरक्षारक्षकांना ही माहिती सांगितली. यानंतर सुरक्षाक्षकाने पवई पोलिसांना ही माहिती दिली. घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतल्यांनतर तिथे पिंटू हा मुलींना डोकावून पाहत असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला नंतर पोलिसांनी अटक केली.

दिवाळीभेट! शेतकऱ्यांना पाच हजाराची मदत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर

रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस

दिव्यांगाना जन्मापासून पेन्शन; केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय

विद्यार्थी आंदोलनाच्या आड येऊ नका - राहुल गांधी

महागाईचा आगडोंब! सप्टेंबरमध्ये नवीन मालिकेतील चलनवाढीचा उच्चांकी दर