File Photo 
मुंबई

मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक स्थगित ; आदित्य ठाकरे संतापले

मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीला स्थगिती दिल्याने राजकीय पक्षांसह विद्यार्थी संघटना नाराज झाल्या आहेत. तर विरोधक या स्थगितीविरोधात आक्रमक झाले आहेत.

नवशक्ती Web Desk

मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीला स्थगिती दिल्याने राजकीय पक्षांसह विद्यार्थी संघटना नाराज झाल्या आहेत. तर विरोधक या स्थगितीविरोधात आक्रमक झाले आहेत. ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. स्थानिक आणि लोकसभा निवडणुकांप्रमाणे मुख्यमंत्री सिनेट निवडणुकीला देखील घाबरले अशी टिका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

मुंबई विद्यापीठाकडून ९ ऑगस्ट रोजी सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. १० सप्टेंबर रोजी निवडणूक घेऊन १३ सप्टेंबरला या निवडणुकांचा निकाल लागणार होता. मात्र, काल व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्याच निर्णय घेण्यात आला. यावरुन विरोध आणि विद्यार्थी संघटनांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. गुरुवारी रात्री ११ वाजता सिनेट निवडणुकांचे पत्र समोर आले. ही निवडणूक पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगित करण्यात आली. आमचा निकाल १०० टक्के लागणार होता. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आणि त्यानंतर स्थगिती आली. येथे मणिपूरसारख वातावरण नाही, वाद, भांडण नाही. सव्वा लाख मतदारांनी यात आपल नाव नोंदवलं आहे. मग निवडणूक स्थगित करण्यात आली असं काय घडल? असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे. मुंबई विद्यापिठाच्या अधिकाऱ्यांचे फोन बंद येत असून कोणीही कारण सांगायला तयार नसल्याचं देखील आदित्य म्हणाले.

यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, दोन पक्ष फोडले, दोन परिवार फोडले. महाशक्ती सोबत अशून निवडणुकीला घाबरता का? लोकसभेला देखील असं करण्याची शक्यता आहे. निवडणुका जाहीर करतील आणि नंतर स्थगिती देतील. तुमचं सरकार सिनेट पाडणार नाही, आम्हीच पाडणार आहोत. त्यांची पूर्ण तयारी झाली आहे की नाही माहिती नाही. पण तयारी झाली नसेल म्हणून असं केलं, अशी कोपरखळी आदित्य ठाकरे यांनी मारली.

एकनाथ शिंदेंच्या 'त्या' वक्तव्यावर सुषमा अंधारेंचा पलटवार; म्हणाल्या, "तुम्हाला आनंद दिघेंची शपथ...

Navi Mumbai Airport : पहिल्या दिवशी ३० विमानांची ये-जा; आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक कधीपासून? CIDCO उपाध्यक्षांनी दिली माहिती

भारत २०३५ पर्यंत अंतराळ स्थानक उभारणार; अंतराळवीरांना २०४० पर्यंत चंद्रावर उतरवणार

BMC Elections: महापौरपदासाठी लॉटरी? आरक्षणाची माळ कोणत्या प्रवर्गाच्या गळ्यात पडणार? प्रक्रिया आठवडाभरात पूर्ण होणार

उबर-ओला-रॅपिडोसाठी केंद्र सरकारचा नवा नियम; महिला प्रवाशांसाठी खास सोय, राईडआधी टिप मागितली तर...