सृष्टी विशाल तुली, आदित्य ऋषिकेश पंडित (डावीकडून) 
मुंबई

प्रियकराची जामिनावर सुटका; वैमानिक तरुणीचे आत्महत्या प्रकरण

एअर इंडियाच्या वैमानिक तरुणीने गेल्या महिन्यात केलेल्या आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेल्या प्रियकराला दिंडोशी सत्र न्यायालयाने शुक्रवारी मोठा दिलासा दिला.

Swapnil S

मुंबई : एअर इंडियाच्या वैमानिक तरुणीने गेल्या महिन्यात केलेल्या आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेल्या प्रियकराला दिंडोशी सत्र न्यायालयाने शुक्रवारी मोठा दिलासा दिला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश टी. टी. आगलावे यांनी आरोपी आदित्य पंडितची जामीनावर सुटका केली.

मरोळ परिसरातील 'कनकिया रेन फॉरेस्ट' इमारतीत भाड्याच्या घरात राहणारी २५ वर्षीय वैमानिक सृष्टी तुली ही २५ नोव्हेंबरला पहाटे मृतावस्थेत आढळली होती. सृष्टीच्या वडिलांनी तिच्या प्रियकरावर संशय व्यक्त करत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला.

सृष्टीच्या आत्महत्येपूर्वी पाच-सहा दिवस आदित्य हा तिच्यासोबत एकाच खोलीत राहत होता. मात्र, घटनेच्या दिवशी आरोपी आदित्य पंडित दिल्लीला गेला. आदित्य आणि तुली यांच्या जेवणाची आवड वेगवेगळी होती. यावरून त्यांच्यात वाद झाला होता, असे सृष्टीच्या वडिलांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आदित्य पंडितविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. १०८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आजचे राशिभविष्य, ५ जुलै २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Kitchen Tips : पावसाळ्यात स्वयंपाकघरातील सामान खराब होण्याची चिंता? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स

"६ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा, अनावश्यक प्रवास टाळा"; मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना आवाहन

Telegram ला केंद्र सरकारची नोटीस; बेकायदेशीर चित्रपट आणि ओटीटी कंटेंटवर कारवाईचे निर्देश

Mumbai Rain : पावसाचा जोर कायम; मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत