मुंबई

भिवंडीतील अंजूर-भरोडी येथे बुलेट ट्रेन डेपो; बांधकामाला होणार लवकरच सुरुवात

Swapnil S

सुमित घरत/भिवंडी : मुंबई-अहमदाबाद शहरास जोडणारी हायस्पीड बुलेट ट्रेनचे काम नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडमार्फत सुरू असून, ही भारतातील पहिली हाय-स्पीड रेल्वे लाईन आहे. या बुलेट ट्रेनसाठी ठाणे रोलिंग स्टोक डेपोचे बांधकाम भिवंडी तालुक्यातील अंजूर-भरोडी या गावात येत्या महिन्याभरात सुरू होणार असल्याची माहिती सूत्राने दिली आहे. हे काम जपानमधील शिंकनसेन मानकांसह होणार असून, त्याप्रकारे ट्रेनची देखभाल तयार करण्याचे काम करण्याची वर्क ऑर्डर कंत्राटदाराला मंगळवारी देण्यात आली आहे.

या प्रकल्पासाठी भिवंडीतील भरोडी-अंजूर या गावामधील ५५ हेक्टर सरकारी जागा आरक्षित केली असून, त्या जागेवर नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएचएसआरसीएल) यांनी दिनेशचंद्र (डीएमआरसी) यांच्या संयुक्त उपक्रमात डेपोच्या 'डिझाइन आणि बांधकाम' करण्यासाठी स्वीकृती पत्र जारी केले. डेपोच्या कामामध्ये नागरी कामे, तपासणी शेड, देखभाल डेपो आणि स्थापना, चाचणी आणि देखभाल सुविधा सुरू करणे याचा समावेश करण्यात आला आहे.

या बुलेट ट्रेन रोलिंग स्टॉक डेपोचे उद्दिष्ट जपानी शिंकनसेन ट्रेन डेपोपासून प्रेरणा घेऊन भारतात देखभालीसाठी एक मानक स्थापित करावयाचे आहे, अशी माहिती एनएचएसआरसीएल च्या प्रवक्त्या सुषमा गौर यांनी देऊन सांगितले की, या सुविधांमध्ये अत्याधुनिक पर्यावरण-अनुकूल वैशिष्ट्ये समाविष्ट होतील. हा प्रकल्प भरोडी-अंजूर येथील सुमारे ५५ हेक्टरमध्ये पसरलेला असून, त्यात ट्रेनसेटची देखभाल आणि प्रकाश देखभालीची सुविधा असेल. सुरुवातीला चार इन्स्पेक्टन लाईन आणि १० स्टेबलिंग लाईन, भविष्यात अनुक्रमे आठ आणि ३१ पर्यंत वाढणार आहेत. डेपोमध्ये बोगी एक्स्चेंज मशीन, अंडरफ्लोर व्हील री-प्रोफाइलिंग मॅचाइन, टेस्टर्स आणि डेटा रिडर, अल्ट्रासोनिक फ्लॉ डिटेक्टर आणि डेटा रिडर, अल्ट्रासोनिक फ्लॉ डिटेक्टर आणि ट्रेनसेट वॉशिंग प्लांटसह विविध मशिनरी असतील. त्यांचा वापर हायस्पीडच्या देखभालीसाठी केला जाईल. यासाठी ट्रेनसेट हे जपानमधून खरेदी केले जाणार आहेत.

डेपोमध्ये जलस्रोत व्यवस्थापन यंत्रणा

या बुलेट ट्रेनसाठी गुजरातमध्ये साबरमती आणि सुरत येथे आणखी दोन निक्षेपांचे बांधकाम सुरू आहे. मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वेवरील डेपोमध्ये जलस्रोत व्यवस्थापन यंत्रणा असतील. साबरमती डेपोची पाण्याची गरज छतावरील पावसाचे पाणी आणि बोअरवेलमधून साठवून पूर्ण केली जाईल. तर ट्रेनसेट्समधून आणि डेपोमध्ये निर्माण होणारे सांडपाणी आधुनिक सीवेज ट्रिटमेंट प्लांटमध्ये प्रक्रिया करून आणि त्याचा पुनर्वापर केला जाईल. हे पुनर्वापर केलेले पाणी डेपोच्या गरजेच्या ७०% गरज पूर्ण करेल. भिवंडीतही डेपोमध्ये छतावरील पावसाचे पाणी साठवण तसेच मलनिस्सारण प्रक्रिया आणि सांडपाणी प्रक्रिया करण्यासाठी संयंत्रे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त