मुंबई

प्रशांत कोरटकरचा जामीन रद्द करा; राज्य सरकारची हायकोर्टात धाव, याचिकेवर आज तातडीने सुनावणी

इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याचा आरोप असलेल्या तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकरचा जामीन रद्द करण्यासाठी राज्य सरकारने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

Swapnil S

मुंबई : इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याचा आरोप असलेल्या तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकरचा जामीन रद्द करण्यासाठी राज्य सरकारने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. कोरटकरला कोल्हापूरच्या कनिष्ठ न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. त्याच्या अटकेसाठी मुभा देण्याची विनंती सरकारने केली आहे. याची दखल घेत न्या. राजेश पाटील यांनी याचिकेची मंगळवारी तातडीने सुनावणी घेण्याचे निश्चित केले आहे. कोरटकरने राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याचाही आरोप आहे.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या आणि प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या छावा चित्रपटावर इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी त्यांची परखड भूमिका मांडली होती. ती भूमिका ब्राह्मण समाजाचा द्वेष करणारी असल्याचा आरोप करीत तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकरने इंद्रजीत सावंत यांना फोन कॉल करून धमकी दिली.

कोरटकर हा पोलीस तपासात सहकार्य करीत नसून पोलीस ठाण्यात हजर राहण्यासाठी टाळाटाळ करीत आहे. त्याचा तपासावर गंभीर परिणाम होत असल्याचा दावा राज्य सरकारने केला आहे. सरकारच्या वतीने ॲड. हितेन वेणेगावकर यांनी सोमवारी न्या. राजेश पाटील यांच्या समोर याचिका निदर्शनास आणून दिली.

अटकेची शक्यता

सरकारने कारवाईत सक्रियता दाखवल्यामुळे कोरटकरच्या अटकेची शक्यता वाढली आहे. कोरटकरने राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत